आमिर खान (Amir Khan) ‘३ इडियट्स’ या सिनेमामध्ये एकत्र दिसणारे ‘आमिर खान’ आणि ‘करीना कपूर’ आता पुन्हा एकदा ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमामध्ये दिसणार आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा रिलीज व्हायला ९ दिवस बाकी आहेत. अशातच या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. करीना कपूर या सिनेमामध्ये ‘मनप्रीत कौर’ची भूमिका साकारणार आहे.
आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिर खानचा हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर या सिनेमावर नेटकऱ्यांकडून बहिष्कार घालण्यात येत आहे. यासंदर्भात ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या करीना कपूरने वक्तव्य केलं आहे.
‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमावर बहिष्कार घातला जातोय कारण, करीना कपूर तिचे सिनेमे स्वत: पाहत नाही आणि इतरांना पाहण्याचा सल्ला देते. ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये आमिरने भारतीय संस्कृतीच्या विरोधात अनेक विधाने केली आहेत. दुसरीकडे ‘फॉरेस्ट गंप’ची कॉपी केल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. त्यामुळेच त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्यात येत आहे.
बहिष्कार टाकण्याबाबत करीना म्हणाली की, ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मोहिम राबवली जात आहे. सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तिला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. जगातील प्रत्येकाची आवड-निवड वेगळी आहे. एखादी गोष्ट एखाद्याला आवडते. तर दुसऱ्याला ती आवडत नाही”. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत करीनाने हे भाष्य केले आहे.
पुढे करीना म्हणाली की, “मी सोशल मीडियावर माझ्या आवडीच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आमचा सिनेमा चांगला असेल तर बहिष्कार घालणारे काय करतील? सिनेमा चांगला असेल तर तो येणाऱ्या अडचणींचा सामना करत चांगले यश कमावतो. बहिष्काराकडे दुर्लक्ष करत आता पुढे जायला हवं”
‘3 इडियट्स’ या सिनेमात एकत्र दिसल्याने आमिर आणि करीनाची जोडी सगळ्यांच्या पसंतीस उतरली होती. आता ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहते या जोडीला आताही तेवढंच प्रेम देतील अशी अपेक्षा आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासाठी आमिरनं पन्नास कोटी रूपये मानधन घेतलं आहे. करिनानं आठ कोटी रूपये मानधन घेतलं आहे. दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्यनं या चित्रपटासाठी सहा कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या
Alia bhatt: मी माझी ब्रा का लपवून ठेवायची? आलिया भटचा रोखठोक सवाल; सेक्सीस्ट कमेंट्सबद्दल म्हणाली..
मविआ’त बिघाडी! यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार; बड्या शिवसेना नेत्याची घोषणा
नड्डा म्हणाले शिवसेना संपवणार, आता सेना नेते म्हणतात शिंदेंना स्वाभिमान असेल तर राजीनामा द्यावा
Sanjay Raut: पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार झाला कसा? ED च्या बिनतोड युक्तीवादाने राऊतांच्या वकीलाची बोलती बंद