पार्सल घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीसोबत अश्लील कृत्य केलं असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या डोळ्यादेखत पॅन्टची चेन काढून किळसवाणं कृत्य केलं आहे. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण झालं आहे.
ही घटना पुणे शहरातील कोंढवा खुर्द परिसरात घडली आहे. पीडित तरुणीचे वय 30 वर्ष आहे. तिनं आरोपी डिलिव्हरी बॉयच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी डिलिव्हरी बॉयचे नाव जोगेंदर बिंद्रा असे असून, तो 40 वर्षांचा आहे. हा तरुण एका ऑनलाइन कंपनीसाठी डिलिव्हरी बॉयचं काम करतो. ही घटना मंगळवारी घडली आहे. घटनेच्या दिवशी पीडित तरुणीने ऑनलाइन अँपद्वारे सिगारेटची ऑर्डर केली होती.
तेव्हा हा तरुण पार्सल घेऊन तरुणीच्या घरी आला होता. तरुणीनं पार्सल घेतल्यानंतर आरोपीनं पीडितेच्या समोरच आपल्या पॅन्टची चेन उघडली. तरुणीसमोरच तो अश्लील कृत्य करू लागला. हे पाहून तरुणी खाबरली. तरुणी एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.
तरुणीने काही वेळानंतर त्या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. या घटनेचा सविस्तर तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील वाकड या भागात एका स्वीगी डिलिव्हरी बॉयने तरुणीचे रस्त्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला केला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. डिलिव्हरी बॉय अचानकपणे तरुणीसमोर गेला आणि त्याने तरुणीला अश्लिल शेरेबाजी करत, तिला एका हाताने जवळ ओढून मिठी मारुन तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता.