दिल्ली पोलिसांसह दिल्ली महिला आयोगाने ८ महिन्यांच्या बाळाची सुटका केली आहे. ज्याला त्याच्या आई-वडिलांनी ५ लाख रुपयांना विकले होते, त्यावेळी मुल फक्त ३ दिवसांचे होते. मुलांची विक्री केल्यानंतर पूर्ण रक्कम न मिळाल्याने मुलाच्या आईने दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली, त्यानंतर आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली.(Smuggling, Women’s Commission, Complaints, Inquiries)
आयोगाच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या बदल्यात पालकांना ५ लाख रुपये देण्याची चर्चा होती, त्यापैकी २० हजार रुपये तात्काळ देण्यात आले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र ७ महिने उलटूनही पालकांना मुलाची पूर्ण रक्कम न मिळाल्याने मुलाच्या आईने आयोगाकडे तक्रार केली. मुलाला विकणाऱ्या आईने संपूर्ण रक्कम मिळवून द्या अशी तक्रार आयोगाकडे केली. त्यादरम्यान संपूर्ण प्रकरण आयोगाच्या निदर्शनास आले.
मुलाच्या आईने हेल्पलाइन क्रमांक १८१ वर तक्रार केली आणि ज्या महिलेला तिने आपले मूल विकले होते तिच्याकडून उर्वरित रक्कम मिळवून द्या अशी आयोगाकडे मदत मागितली. त्यानंतर आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी तातडीने एक टीम तयार केली. त्यानंतर टीमने मुलाच्या पालकांची कसून चौकशी केली.
चौकशीदरम्यान असे आढळून आले की, त्यांना आधीच ४ मुले आहेत आणि त्यांना पाचवे अपत्य नको होते. अशा परिस्थितीत आईला गर्भपात करायचा होता, तेव्हा तिच्या मित्राने त्यांना तसे करण्यापासून रोखले आणि त्यांनी मुलाला जन्म देऊन विकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुलाच्या आईने हे मान्य केले आणि तिने बाळाला जन्म दिल्यानंतर ३ दिवसांनीच ५ लाख रुपयांना विकले, मुलाच्या आईसह वडिलांनीही याला सहमती दर्शवली.
मुलाच्या जन्मापूर्वीच आई-वडिलांनी त्याच्याशी करार केला, हे प्रकरण मैदान गढी पोलीस ठाण्याचे आहे. ही बाब आयोगाच्या लक्षात येताच दिल्ली पोलिसांना कळवण्यात आले आणि ११ मे रोजी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर दिल्ली महिला आयोग आणि दिल्ली पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आणि १ महिन्यानंतर ११ जून रोजी गुरुग्राममधील एका गावातून बाळाची सुटका करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी मुलाच्या तस्करी आणि विक्रीत गुंतलेल्या ८ जणांना ताब्यात घेतले, त्यात मुलाच्या आईचाही समावेश आहे, ही बाब निदर्शनास आल्यापासून मुलाचे वडील फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. यासोबतच आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेवर निराशा व्यक्त करत पालकांनी स्वत:च्या ३ दिवसांच्या मुलाची विक्री करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले.
दिल्ली पोलीस आणि दिल्ली महिला आयोगाने मुलाची यशस्वीरित्या सुटका केली आहे, जे आता एका आश्रय गृहात सुरक्षित आहे. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. बालकल्याण समितीने त्या बालकाचे योग्य व तात्काळ पुनर्वसन करावे. तस्करीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ती तात्काळ आणि कठोर कारवाईनेच थांबवता येतील आणि ही दुर्दैवाची बाब आहे, असेही आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
काश्मिरी पंडितांचे खून अन् गाय तस्करीवेळचं माॅब लिंचिंग यात काहीही फरक नाही; साई पल्लवीचे बेधडक वक्तव्य
काश्मिरी पंडितांची हत्या अन् गाय तस्करी करणाऱ्या मुस्लिमाला साई पल्लवीच्या वक्तव्याने खळबळ
पुष्पा स्टाईल दारूच्या तस्करीचा प्रयत्न फसला, टँकर पाहून पोलिसही झाले अवाक
पुष्पा स्टाईलने ड्रग्सची तस्करी करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, २८ लाखांचा गांजा केला जप्त