delhi highcourt on uddhav thackeray group | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांसोबतच १२ खासदारही शिंदे गटात गेल्यामुळे शिंदेंनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा ठोकला होता. तसेच आपल्याला धनुष्यबाणाचे चिन्ह मिळावे यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली होती.
त्यानंतर लगेचच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लावण्यात आली होती. त्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवण्यात आले होते. त्या निवडणूकीमुळे उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल आणि तलवार देण्यात आली होती.
तसेच शिवसेना हे नाव वापरण्यावर सुद्धा बंदी घातली होती. हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही, तर त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली होती.
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या गटाने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याविषयी जवळपास दीड तास चर्चाही झाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो बेकादेशीर असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असून गेल्या तीस वर्षांपासून ते पक्ष चालवत आहे. निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी जे दिसतंय त्या आधारावर निकाल दिला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही, असा युक्तीवाद उद्धव ठाकरे गटाने केला होता. पण त्यानंतर उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा सुनावणी होईल असे सांगितले आहे.
आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही फक्त लवकरात लवकर निर्णय घ्या असे सांगू शकतो. तुम्ही त्याबाबत लेखी म्हणणे मांडा. पक्ष आणि चिन्हाबाबत आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशात ठाकरे गट कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर घेतला? हायकोर्टात तुफान घमासान
संजय दत्त, आमिर खानसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या नाकात दम आणणाऱ्या जेष्ठ मराठी अभिनेत्याचे निधन
Siddhant Veer Suryavanshi : जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झालेल्या अभिनेता सिद्धांतची लास्ट पोस्ट व्हायरल; म्हणाला, ‘माझ्या 3 जीवनावश्यक..