Share

दिल्लीने केला मुंबईचा सुपडा साफ, ४ विकेटने जिंकला सामना; मुंबईचा नेहमीप्रमाणे पहिला सामना देवाला

आयपीएलच्या पहिल्या डबल हेडर सामन्यात दिल्ली आणि मुंबई यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या वेगवान खेळीने दिल्लीने मुंबईचा सामना हिरावून घेत ४ विकेटने हरवले आहे. दिल्लीसाठी ही चांगली चांगली सुरुवात आहे. (delhi capitals win against mumbai)

या सामन्यात मुंबईच्या इशान किशन (नाबाद ८१) आणि कर्णधार रोहित शर्मा (नाबाद ४१) यांच्या धडाकेबाज खेळीमुळे मुंबई इंडियन्सने दिल्लीला १७८ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईने २० षटकांत ५ विकेट गमावून १७७ धावा केल्या होत्या. संघाकडून कर्णधार रोहित आणि इशान यांच्यात ५० चेंडूत ६७ धावांची सर्वात मोठी भागीदारी झाली होती, परंतू तरीही दिल्लीने त्यांच्या हातात असलेला सामना हिसकावून घेतला आहे.

टॉस गमावल्यानंतर मुंबईने फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी चांगली सुरुवात केली कारण सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी शानदार फलंदाजी करत पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ५३ धावांची भर घातली. दोन्ही सलामीवीर दिल्लीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत होते.

पॉवरप्लेनंतर, दिल्लीचा स्पिनर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का देत मुंबईवर दबाव आणण्यास सुरुवात केली. रोहित ३२ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४१ धावा करून कुलदीपचा बळी ठरला.

यावेळी कर्णधार रोहित आणि इशान यांच्यातील ५० चेंडूत ६७ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. तिसर्‍या क्रमांकावर आलेला अनमोलप्रीत सिंग (८) पण कुलदीपला त्याची विकेट देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या टिळक वर्माने इशानसह १३ षटकांत दोन विकेट गमावून संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली.

वर्माने काही चांगले शॉट्स खेळले पण त्यानंतर त्याने खलीलच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. पृथ्वी शॉने त्याचा झेल घेतला. यासह दोघांमधील २२ चेंडूत ३४ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. मुंबईने ११७ धावांत तिसरी विकेट गमावली होती. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी खलील अहमदने दोन विकेट घेतल्या.

दिल्लीसमोर विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य होते, जे दिल्ली संघाने १८.२ षटकांत ६ विकेट गमावून पूर्ण केले. अक्षर पटेल १७ चेंडूत ३८ आणि ललित यादवने ३८ चेंडूत ४८ धावा करून नाबाद राहिले आहे. दिल्लीने मुंबईला सलग तिसऱ्या सामन्यात पराभूत केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: इंडियन आर्मीने चीनला दाखवली ताकद, 600 पॅराट्रूपर्सनी चीनच्या सीमेजवळ आकाशातून मारल्या उड्या
माधुरी आणि सिद्धार्थ मल्होत्राने केला रोमँटिक डान्स, व्हिडीओ पाहण्यापासून तुम्हीही स्वतःला रोखू शकणार नाही
ट्युशन टीचरने विद्यार्थिनीला बळजबरीने दाखवले पॉर्न, नकार दिल्यानंतर दिली ‘ही’ धमकी

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now