गोव्यातील अवैध रेस्टॉरंट अँड बार प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर काँग्रेसच्या तीन नेत्यांनी मोठे आरोप केले होते. त्या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना या संदर्भातील ट्विट २४ तासात डिलीट करावे. तसेच १८ तारखेला न्यायालयात हजर राहावे, असा आदेश दिला आहे. (Delete ‘that’ tweet within 24 hours; Delhi court reprimands Congress leaders)
काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा, नेट्टा डिसूजा या तिघांनी इराणी आणि त्यांची मुलगी जोईश इराणी या गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावाचं रेस्टॉरंट चालवतात. ज्याचा परवाना अवैद्य आहे. अशाप्रकारचा गंभीर आरोप स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर केला होता.
कोर्टाने यावर म्हंटले आहे की, ‘काँग्रेस नेत्यांनी तथ्याची पडताळणी केल्याशिवाय अशा प्रकारचे आरोप केले आहेत. त्यामुळे या संदर्भातील ट्विट त्यांनी २४ तासाच्या आत डिलीट करावेत. अन्यथा ट्विटर सारख्या कंपन्यांना ते मागे घ्यावे लागतील.’ तसेच १८ तारखेला या काँग्रेस नेत्यांनी न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे.
यावर स्मृती इराणी यांचा म्हणणं आहे की, ‘माझी मुलगी १८ वर्षांची आहे. ती महाविद्यालयात शिकते. तिचा राजकारणाशी संबंध नाही. तरी देखील माझ्या मुलीवर अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या काँग्रेसला न्यायालयात आणि जनतेच्या दरबारात धडा शिकवला जाईल.’
इराणी यांनी आपल्या मुलीवर आणि आपल्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या तीन काँग्रेस नेत्यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. १८ ऑगस्ट रोजी कोर्टात काय होईल? त्यानंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळतेय हे पाहावे लागेल.
मात्र यावर काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या खटल्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आम्हाला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. आम्ही कोर्टासमोर तथ्य मांडण्यासाठी उत्सुक आहोत.’
महत्वाच्या बातम्या-
शिंदे गटानं आरपीआयमध्ये विलीन व्हावं; रामदास आठवलेंची थेट शिंदे गटाला ऑफर
शाहरूखनंतर ‘डंकी’मधून समोर आला तापसी पन्नूचा फर्स्ट लुक, फोटो पाहून उत्सुकता वाढली
अरेरे! विकी कौशलवर नाही निर्मात्यांचा विश्वास? ‘या’ चित्रपटातून होणार हकालपट्टी