Share

रणवीर सिंगने न्युड फोटोशुट करून धुमाकूळ घातल्यानंतर दीपिकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

deepika

रणवीर सिंगचे(Ranveer Singh) न्यूड फोटोशूट इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकजण एकाच गोष्टीची चर्चा करत आहे. रणवीर किंवा दीपिका दोघांनीही ते इन्स्टाग्रामवर शेअर केले नसून ते व्हायरल झाले आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक फोटोंना लाईक करत आहेत तर काहीजण टीकाही करत आहेत. आता दीपिका पदुकोणची प्रतिक्रियाही समोर आली आहे.(deepika-reacts-after-ranveer-singhs-nude-photo-shoot-creates-controversy)

रणवीरचे हे फोटोशूट खूप आधी येणार होते पण उशीर झाला. वृत्तानुसार, शूटिंगचे प्लॅन आधीच केले गेले होते. रणवीर त्याच्या व्हिजनबाबत(Vision) अगदी स्पष्ट होता. तो दररोज आपल्या कपड्यांद्वारे लोकांना आश्चर्यचकित करत असतो. त्याने त्याच्या न्यूड फोटोंसाठीही मेहनत घेतली. रणवीरसाठी ही फार मोठी गोष्ट नव्हती.

दीपिका पदुकोणच्या(Deepika Padukone) प्रतिक्रियेबद्दल बोलताना, रिपोर्टनुसार, फोटो पाहिल्यानंतर ती खूप प्रभावित झाली. या शूटसाठी ती सुरुवातीपासूनच लूपमध्ये होती. ही कॉन्सेप्ट तिला खूप आवडली. ते फोटो इंटरनेटवर येण्यापूर्वी तिला दाखवण्यात आले होते. दीपिका नेहमीच रणवीरला सपोर्ट करते. त्यामुळे या शूटसाठीही ती पूर्णपणे सोबत होती.

दीपिका रणवीरला आपला चीअरलीडर मानते. रणवीरने स्वतः सांगितले आहे की, त्याचा फॅशन सेन्स(Fashion Sence) पाहून दीपिका आणि तिच्या कुटुंबाला सुरुवातीला विचित्र वाटले. आता सगळ्यांना त्याची सवय झाली आहे. रणवीरने सांगितले होते की जेव्हा तो सासरच्या घरी जातो तेव्हा तो वेगवेगळे कपडे घालतो जे डीसेंटचे असतात.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now