बॉलिवूडमध्ये अनेक अफेअरच्या बातम्या समोर येतात. अनेकांची नाती या मनोरंजन दूनियात जुळतात. तर अनेकांची नाती इथे तुटतात. मात्र असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपले नात्यात नेहमी गोडवा ठेवत नाते टिकवले आहे. अनेक अशी जोडपी आहेत ज्यांना पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. त्याचबरोबर यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला खूप आवडते.
अशी एक जोडी आहे ज्यांच्यामध्ये नेहमी प्रेम दिसून येते. ही जोडी चाहत्यांची लाडकी जोडी आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण. या जोडीला चाहत्यांकडून नेहमी प्रेम मिळाले आहे. या दोघांनी साल २०१८ मध्ये लग्न केले. यांच्या लग्नाचा सोहळा इटलीमध्ये पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यांच्या लग्नाच्या ही खूप चर्चा रंगल्या होत्या.
हे दोघेही एकमेकांबद्दल नेहमी मनमोकळेपणाने बोलतात. याच दरम्यान दीपिकाने रणवीरबद्दल असे काही बोलले होते जे ऐकून उपस्थित सर्वांनाच धक्का बसला होता. इतकेच नव्हे तर खुद्द रणवीर देखील दीपिकाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाला होता. यानंतर दीपिकाचे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
लग्नानंतर दीपिका आणि रणवीर एका लाइव्ह कार्यक्रमात उपस्थित होते. याच दरम्यान दीपिकाने रणवीरबद्दल एक गोष्टी सांगितली होती. जे ऐकून रणवीरला ही धक्का बसला होता. दीपिकाला रणवीरच्या स्टाइल आणि ब्युटी सिक्रेट्सबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देत दीपिका म्हणाली की, “रणवीर बराच वेळ अंघोळ करतो आणि टॉयलेटमध्ये असतो.”
इतकेच नव्हे तर दीपिका पुढे म्हणाली की, “रणवीर बेडवर ही खूप वेळ असतो.” दीपिकाचे हे उत्तर ऐकून सर्वांचं धक्का बसला. काही मिनिट सर्वांनाच प्रश्न पडला की, दीपिका नक्की काय बोलत आहे. खुद्द रणवीर देखील आश्चर्यचकित झाला आणि दीपिकाच्या चेहऱ्याला पाहू लागला. त्यानंतर परिस्थिती सावरत दीपिकाने आपले मत बदलले.
त्यानंतर ती म्हणाली की, “मला म्हणायचे आहे की, रणवीर खूप वेळ झोपतो.” अशा पद्धतीने दीपिकाने पूर्ण परिस्थिती सावरली. दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपट येऊन गेला. तसेच काही महिन्यांपूर्वीच रणवीरचाही ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.