बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच दीपिका समाजकार्यही करत असते. ती मानसिक आरोग्याबाबत नेहमी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत असते. यादरम्यान तिला मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देण्याबाबत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत दीपिकाने सोशल मीडियाद्वारे याची माहिती देत तिचा आनंद व्यक्त केला आहे.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिला ‘टाईम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे तिने सांगितले. यासोबतच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीलाही या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये एका फोटोत दीपिका ‘टाईम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड’ हातात पकडलेली दिसत आहे. यासोबत तिने ‘कृतज्ञ’ असे लिहिले.
दीपिकाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, ‘टाईम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड’ त्या व्यक्तींना देण्यात येते जे त्यांच्या प्रसिद्धीचा वापर लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करत आहेत. तर दीपिकाने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. त्यामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दीपिका पादुकोण स्वतः डिप्रेशनसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. मात्र, तिने या आजाराला धैर्याने सामोरे जात त्यामधून बाहेर पडण्यास यश मिळवले. त्यानंतर तिने ‘लिव्ह-लव्ह-लाफ’ (Live-Love-Laugh) नावाच्या संस्थेची स्थापना केली. ही संस्था मानसिक आरोग्याशी झुंज देणाऱ्या व्यक्तींच्या समस्या दूर करण्यासाठी काम करते.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. त्यानंतर तिने ‘लव्ह आज कल’, ‘हाऊसफुल्ल’, ‘रेस २’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘पद्मावत’, ‘गोलियों की रासलीला राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘८३’ अशा अनेक चित्रपटात काम केले.
नुकतीच दीपिकाचा ‘गहराइयां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट लोकांच्या काही पसंतीस उतरला नाही. तर लवकरच दीपिका ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असून यामध्ये शाहरूख खान मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय दीपिका ह्रतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
RRR साठी आलिया भट्ट नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला पहिल्यांदा आली होती चित्रपटाची ऑफर
दीपिका आणि अनुष्कासारखे स्टार्स आपला कमाईचा मोठा हिस्सा कोठे गुंतवतात? वाचून आश्चर्य वाटेल
RRR नंतर थलपथी विजय चित्रपटगृहात करणार धमाका, ‘BEAST’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज