Share

त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी..; दीपिकाने सांगितला बॉयफ्रेंड रणबीरचा ‘तो’ किस्सा

Deepika Padukone

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आज पती रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) सुखाचा संसार करत आहे. पण एककाळ असा होता जेव्हा दीपिका अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) प्रेमात वेडी होती. दीपिका आणि रणबीर दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होते. पण त्यानंतर असे काही झाले ज्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर दीपिकाची फसवणूक करत होता. यामुळे दीपिका डिप्रेशनमध्येसुद्धा गेली होती. यासंदर्भात दीपिकाने स्वतः एका मुलाखतीत बोलताना याचा खुलासा केला होता.

रणबीर कपूरसोबतचे नाते तुटल्यानंतर दीपिका आतून खूपच तुटून गेली होती. याबाबत एका मुलाखतीत बोलताना दीपिकाने प्रेम, शारीरीक नातेसंबंध यावरही मोकळेपणाने बोलली होती. तिची ही जुनी मुलाखत आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. दीपिकाने म्हटले होते की, ‘माझ्या मते सेक्स म्हणजे केवळ शारीरीक संबंध नव्हे तर यामध्ये भावनाही जोडलेल्या असतात’.

‘मी कोणत्याही रिलेशनशीपमध्ये असताना कोणाचीही फसवणूक केली नाही. मी जर कोणाची फसवणूक करत असेन तर रिलेशनशीपचा अर्थ काय? यापेक्षा मी एकटं राहणं आणि मजा करणं हे उत्तम, नाही का? पण सर्वचजण माझ्यासारखं विचार करत नसतात. त्यामुळेच बहुशा मी जास्त दुखावली गेले असेन’.

दीपिकाने पुढे सांगितले की, ‘पहिल्यांदा जेव्हा त्याने मला धोका दिला तेव्हा मला वाटलं की, या रिलेशनशीपमध्ये किंवा माझ्यात काही समस्या असेल. पण जेव्हा फसवणूक करणे एखाद्याची सवय होऊन जाते तेव्हा तो पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहतो’.

‘मी तर इतकी वेडी होते की, त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी त्याला दुसरी संधी दिली. त्याने माझाकडे भीक मागितली होती, विनंती केली होती त्यामुळे मी त्याला माफ केले. पण ती माझी चूक होती. या सर्वांमधून बाहेर पडण्यास मला खूप वेळ लागला. पण आता मी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे मला पुन्हा कोणी पूर्वीसारखं फसवू शकणार नाही’.

दरम्यान, रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिकाने २०१८ साली रणवीर सिंहसोबत लग्न केले. दोघांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास दोघेही ‘८३’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात रणवीर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय दीपिकाचा नुकताच ‘गेहराइयां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ
‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांच्या अपघाताचे खरे कारण आले समोर, वाचा नेमकं काय घडलं..
‘तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावूक पोस्ट

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now