अलीकडे अभिनेत्री आण शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या चांगल्याच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपाली यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. दीपाली यांच्या वक्तव्याने वादाला तोंड देखील फुटले होते.
तो वाद नवीन असतानाच आता दीपाली यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली आहे. शनिवारी सभेत बोलताना ‘फडणवीसांनी पाय जरी ठेवला असता तर बाबरी ढाँचा पडला असता,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या याच टीकेला रविवारी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘केवढा माझ्यावर विश्वास आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, कशाला लपवायचे आज माझे वजन १०२ किलो आहे आणि जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझे वजन १२८ किलो होते. पण ठाकरेंना ही भाषा समजत नाही म्हणून त्यांच्या भाषेत सांगतोय, सामान्य माणसाचा ‘एफएसआय’ जर १ असेल, तर माझा एफएसआय १.५ आहे आणि बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझा ‘एफएसआय’ २.५ होता.’
याचाच धागा पकडत दीपाली यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या,’ अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
याबाबत ट्विटमध्ये दीपाली म्हणतात, ‘वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, दुसरो को हल्का करने के चक्कर मे मामी का युसूफ लकडावाला से ढोंग्या. जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी फडणवीस यांना लक्ष केलं आहे.
दरम्यान, यावरुन राजकारण देखील चांगलच रंगल. याच प्रकरणावर बोलताना भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमची तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या शरीराविषयी टीका करू नये. तुम्ही कधी आरशात स्वत: चा चेहरा पाहावा मग विचार करावा,’असं राणेंनी म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ताजमहालच्या कोर्टाच्या टिप्पणीची अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला, सत्य बाहेर येईल या भीतीने..
ताजमहालातील २२ खोल्या उघडण्यासाठी याचिका करणारांना न्यायालयाने झाप झाप झापले; म्हणाले…
ताजमहाल आमच्या मालकीचा, आदेश दिल्यास कागदपत्रेही दाखवू, भाजप खासदाराचा मोठा दावा
ताजमहाल मुघलांचा नाही तर आमच्या पूर्वजांचा; जयपूरच्या राजकन्येचा पुराव्यानिशी दावा