Share

‘अयोध्या दौऱ्याकरता राजसाहेबांनी मोदींचा सल्ला घ्यावा, माफीनाम्याची गरज पडणार नाही’

narendra modi

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाली सय्यद चांगल्याच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केलं होतं. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता.

त्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. अटक झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली.

तर दुसरीकडे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केलं होतं.सोमय्या काय त्या कारमध्ये जर मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती असं खळबळजनक विधान दिपाली सय्यद यांनी केलं.  या विधानावरुन मोठा वादंग झाला होता.

पुन्हा एकदा सोनालीने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भोंगा प्रकरणानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली.

याचाच धागा पकडत सोनाली यांनी ट्विट केलं आहे. ‘मोदिंना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणार्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौर्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही,’ असं म्हणत सोनाली यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

https://twitter.com/deepalisayed/status/1524266313006587904?s=20&t=at9x9UZXmNEteQPLzjhRbg

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.

भाजप खासदाराने दिलेल्या धमकी नंतर आता राज ठाकरेंचा दौरा चर्चेत आला आहे. मात्र दुसरीकडे एका भाजप खासदाराने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे भाजपात दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोध असताना मात्र दुसरीकडे भाजप खासदाराने पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

राज ठाकरेंच्या अयोद्या दौऱ्याचं स्वागत भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी केलं आहे. जो कुणी श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येईल त्याचं स्वागत आहे. हनुमानजींच्या कृपेने जर कुणी अयोध्येत श्री रामाच्या चरणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंना उंदीर म्हटल्याने भडकले शिवसैनिक; म्हणाले, एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून…
महाराष्ट्र देखील लखनौ, वाराणसी या ठिकाणी कार्यालय उघडणार- संजय राऊत
राजकारण तापलं! राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध
राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर.., राज ठाकरेंना धमकी आल्यानंतर मनसे आक्रमक

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now