Share

“तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे, पण अमित ठाकरे मात्र सुरक्षित आहेत, कुठे लपले आहेत ते?”

raj thackeray

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाली सय्यद चांगल्याच चर्चेत आहेत. भोंगा प्रकरणानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली.

याचाच धागा पकडत सोनाली यांनी ट्विट केलं आहे. ‘मोदिंना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणार्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौर्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही,’ असं म्हणत सोनाली यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

आता पुन्हा एकदा दीपाली यांनी ट्विट करत मनसेला डिवचल आहे. दीपाली यांनी ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे. ट्विटमध्ये त्या म्हणतात,  “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको.”

https://twitter.com/deepalisayed/status/1524406510318587905?s=20&t=f8pX8Ii_HUk8aGusqaMpdA

सध्या दीपाली यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याचबरोबर दीपाली यांनी या ट्विटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे अधिकृत आणि शिवसेनेला मेंशन केले आहे. यावर अद्याप मनसे नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नसून मनसेच्या प्रतिक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दीपाली यांनी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केलं होतं. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

अटक झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली.  तर दुसरीकडे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केलं होतं.

सोमय्या काय त्या कारमध्ये जर मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती असं खळबळजनक विधान दिपाली सय्यद यांनी केलं.  या विधानावरुन मोठा वादंग झाला होता. त्यानंतर आता दीपाली या सातत्याने मनसे आणि राज ठाकरे यांना टार्गेट करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
“काय झालं, कसं झालं, कुठे झालं? सगळं सांगते…, दुसऱ्या लग्नाबाबत सोनाली कुलकर्णीचा खुलासा
प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर अख्या गावाचीच लाइट घालवायचा; गावकऱ्यांना समजताच…
“तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, टीझरमधून मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन
शरद पवारांनी आतापर्यंत ५ वेळा माफी मागितली असती; राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या युपीतील खासदाराचे वक्तव्य

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now