Share

deepali sayyad : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने रचला होता राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट; स्वीय सहायकाने केला गौप्यस्फोट

raj thackeray

deepali sayyad plan for mns leader raj thackeray  | दीपाली सय्यद या त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या माजी पीएने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा एकदा माजी पीए भाऊसाहेब शिंदेंनी दीपाली सय्यद यांच्यावर आरोप केले आहे.

दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. शिंदेंनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.

दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टमधून होणारे सर्व व्यवहार बेकायदेशीर आहे. तसेच यासाठी येणारा पैसा हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहाकाऱ्यांद्वारे पुरवला जातो, असा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते काही पुरस्कार दिले होते. यावेळी ५० लोकांना ५० हजारांचे चेक देण्यात आले होते. ते सर्व चेक बनावट होते. सय्यद यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सातशे ते आठशे कोटींचा व्यवहार झाला आहे. हा सर्व पैसा आला कुठून? असाही प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला आहे.

तसेच त्या पैशांची चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे दीपाली सय्यद यांच्याविरोधातले पुरावे सुद्धा आहे. राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचे सर्व पुरावे आपण शासनाला देऊ शकतो, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यासाठी दीपाली सय्यद यांनी भाजप खासदार बृजभूषण सिंग यांची भेट घेतली होती. अयोध्या दौऱ्यात दीपाली सय्यद या बृजभूषण सिंग यांना राज ठाकरेंविरोधात उचकवत होत्या, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
pankaj deshmukh : देशासाठी काय पण! मोठा मुलगा शहीद झाला असतानाही आईने दुसऱ्या मुलाला केलं सैन्यात भरती
केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या विधवा सुनेने केला करवा चौथ उपवास, जाणून घ्या त्यामागील कारण
डॉक्टरांच्या चुकीमुळे व्यक्तीला गमवावा लागला प्रायव्हेट पार्ट, भरपाई म्हणून 9 कोटींची मागणी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now