Share

दीपक केसरकरांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदेंच्या आजारपणामागंच खरं कारण; म्हणाले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त काल अचानक समोर आल्याने सर्व स्तरावरून त्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता या संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बातचीत केली आहे. (Deepak Kesarkar said the real reason behind Chief Minister Shinde’s illness; said..)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीबाबत केसरकरांना पत्रकारांनी विचारल्यानंतर केसरकर म्हणाले की, ‘मी जेव्हा त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्यांची नियमित आरोग्य तपासणी चालू होती. ते आजारी नाहीत. मात्र त्यांना खूप थकवा आलेला आहे.’

पुढे ते म्हणाले की, ‘मागील कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रभर ते दौरे करत आहेत. यादरम्यान रात्री दोन- तीन वाजेपर्यंत लोक त्यांची वाट पाहत बसलेले असतात. त्या लोकांना न भेटता पुढे निघून जाणे मुख्यमंत्र्यांना योग्य वाटत नाही.’

‘त्यामुळे त्या लोकांची भेट घेऊन मग त्यांचं तीन-चारनंतर झोपायला जाणं, सहा- सात वाजता पुन्हा उठणं म्हणजे फक्त दोन तीन तासाची झोप, अशी झोप तर कोणत्या पण माणसाला पुरेशी नाही. त्यामुळेच त्यांना अति थकवा आला आहे,’ असं केसरकरांनी सांगितलं.

‘त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली तर ते लोकांची अधिक चांगल्याप्रकारे सेवा करू शकतील,’ असं माझं वैयक्तिक मत आहे. मी ते त्यांना बोलूनही दाखवले आहे, असे केसरकरांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा मागील आठ दिवसांपासून असाच धावपळीचा दिनक्रम असल्याने त्यांची मोठी दगदग झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असे यावेळी केसरकर यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-
Bangladesh: चालत्या बसमध्ये केला महिलेवर बलात्कार, प्रवाशांना पडद्याने ठेवले बांधून, वाचून थरकाप उडेल
Election: आमदाराला त्याच्याच साध्या कार्यकर्त्याने धोबीपछाड देत जिंकली निवडणूक; केला सुपडा साफ
Eknath Shinde: बंडानंतरही औरंगाबादमध्ये शिंदे गटाचा दणदणीत विजय; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दारूण पराभव

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now