deepak kesarkar : मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे हे चांगलेच कामाला लागले आहेत. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे हे चांगलेच राजकारणात सक्रिय झाले आहेत. राज्यात सत्तांतर होताच विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार सकाळी सहा वाजेपासून काम करतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राजकारण चांगलच तापलं होतं. सुळे यांच्या वक्तव्यावर थेट एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. ताई मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो, असं शिंदे म्हणाले होते.
त्यावर अजित पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं होतं. एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?, असा थेट सवाल अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला होता. यावरून थेट मुख्यमंत्री शिंदे आणि विरोधक आमने – सामने आले होते.
असं असतानाच आता याच वादात शिंदे गटातील दीपक केसरकर यांनी उडी घेतली आहे. ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काम करतात,’ असं केसरकर यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. आता यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे..
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले आहे की, ‘मुख्यमंत्री शिंदे एवढे काम करतात की, त्यांना शेवटी डॉक्टरांना त्यांना सलाईन द्यावी लागते, तर ते उद्यासाठी तयार होतात. मात्र याबाबत शिंदे कधीही प्रदर्शन करत नसल्याच यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागरिकांच्या कामासाठी ते खूप वेळ देतात, असा मुख्यमंत्री कधी राज्यानं पाहिला नसेल, असं म्हणतं केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. सध्या केसरकर यांच्या वक्तव्याची राज्यात तुफान चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!