मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात अनेक दुःखद घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच गाणं कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे देखील निधन झाले. तसेच पंजाबी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याचे देखील अपघाती निधन झाले. त्या अभिनेत्याचे नाव दीप सिद्धू असे होते.
अभिनेता दीप सिद्धूकडे एक उत्कृष्ट नवोदित कलाकार म्हणून पाहिले जात होते. दीपचे मंगळवारी (१५ फेब्रुवारी) एका अपघातात निधन झाले. त्याचा पंजाब मधील सोनीपत जिल्ह्यातील कुंडली सीमेजवळ अपघात झाला. यादरम्यान दीप हा त्याच्या स्कार्पिओ गाडीतून जात होता. त्यावेळी त्याची गाडी ट्रकमध्ये शिरली असल्याने हा अपघात घडला.
दीप हा स्वतः गाडी चालवत होता. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र आता पोलिसांना ट्रक चालकाला अटक करण्यात यश मिळाले आहे. या ट्रक चालकाचे नाव कासिम आहे. तो मूळचा हरियाणातील नहू येथील गावातील रहिवासी आहे. तसेच आज (१८ फेब्रुवारी) या चालकाला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचबरोबर सध्या पोलीस या चालकाकडून घटनेची संपूर्ण माहिती घेत आहेत.
तसेच दीपच्या भावाने या ट्रक चालकाच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्याच्या कुटुंबीयांचा असा अंदाज आहे की, हा एक अपघात नसून कट रचून त्याची हत्या केली आहे. तसेच या अपघाताची अशी माहिती समोर आली होती की, हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. ते दीपची गाडी ही खूप वेगात होती. दीपचा नियंत्रण सुटून त्याची गाडी ही या ट्रकमध्ये शिरली.
मात्र, घटना स्थळाची माहिती घेत पोलिसांचे मत आहे की, दीपची गाडी अगदी वेगात होती आणि ट्रक देखील रस्त्याच्या कडेला उभा नव्हता. तसेच या घटनेवेळी दीपसोबत त्याची गर्लफ्रेंड रीना रॉय देखील गाडीमध्येच होती. तर तिने दिलेल्या माहितीनुसार, दीपला झोप लागल्याने ही संपूर्ण घटना घडली होती.
मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणात विविध पद्धतीने तपास करत आहेत. याच प्रकरणात पोलीस ट्रक चालकाचाही शोध घेत होते. आणि पोलिसांच्या हाती यश देखील आले आहे. अपघात झालेल्या ट्रकचा चालक देखील आता सापडला आहे.
मात्र पोलिसांचं असं मत आहे की, जर ट्रक हा रस्त्याच्या कडेला उभा होता. तर मग चालकाला पळून जाण्याची काय गरज होती? सध्या पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास घेत आहे. हे संपूर्ण प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. आता हे पाहणे महत्वाचे असेल की, नक्की त्या रात्री काय घडले. नक्कीच हा अपघात होता की ही एक हत्या आहे.