भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्यांक दर्जा रद्द करा, या मागण्यांचा प्रस्ताव प्रयागराज धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला. संगम नगरी प्रयागराजमध्ये ब्रह्मर्षी आश्रममध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या धर्म संसदेत देशभरातून शेकडो साधू संत सहभागी झाले होते.(Declare Muslim minority status by declaring India)
यावेळी सर्वांच्या अनुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे आजपासूनच लिहायला सुरुवात करा. आजपासूनच ही चळवळ सुरू करा, म्हणजे भविष्यात हे आंदोलन मोठं होईल आणि जनतेच्या दबावाखाली सरकारला एक ना एक दिवस झुकावेच लागेल, असं आवाहन या संमेलनात करण्यात आलं.
या आव्हानाला सर्व साधू-संतांनी शंखनाद करून आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यामुळे देशभरात भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची चळवळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सव्वा कोटी जनतेने स्वतः भारताला हिंदू राष्ट्र म्हण्याला पाहिजे याचसोबत ते लिहिला ही सुरुवात केली पाहिजे.
संतानी असे संगितले की, तेव्हाच आपले आंदोलन मोठे होईल आणि सर्वामुळे अखेर सरकारला झुकावेच लागेल. संत संमेलनाचा उद्देश भारताला हिंदू राष्ट्र बनविने आहे. तसेच इस्लामी जिहाद दूर करणे आहे. यावेळी भारतातील सर्व मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचा मागणीही करण्यात आली.
हिंदूच्या मठ आणि मंदिरांचं अधिग्रहण संपुष्टात आणणे आदी प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आले. तुरुंगात बंद असलेले धर्म गुरू नरसिंहानंद गिरी महाराज आणि वसीम रिझवी ऊर्फ नारायण सिंह त्यागी यांना तुरुंगातून लवकरात लवकर सोडण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोणत्याही अटीशिवाय या दोन्ही धर्म गुरूंची सुटका करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलं. जिल्हा प्रशासनाने संताना फोन करून संमेलनात येण्याचेही टाळले.
संतानी संमेलनात सहभागी होऊ नये म्हणून त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आणले, असा आरोपही यावेळी करण्यात आला. यादरम्यान प्रयागराज प्रशासनाच्या दबावानंतर धर्म संसदेचे नाव बदलून संत संमेलन करण्यात आले. धर्म संसद भरवण्यास प्रशासनाने नकार दिल्यामुळे त्याचे नाव बदलून संत संमेलन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
आमच्या किराणा दुकानातून वाईन विक्री करणार नाही; नागपूरच्या चिल्लर किराणा संघटनेचा मोठा निर्णय
भारताचे पुढील राष्ट्रपती कोण? उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसह ‘या’ बड्या नेत्यांची नावं आघाडीवर