छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपे देबिना बेनर्जी आणि गुरमीत चौधरी (Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary) आई-बाबा झाले आहेत. देबिनाने रविवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सोशल मीडियाद्वारे दोघांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या बाळाची पहिली झलकसुद्धा दाखवली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
गुरमीत आणि देबिनाने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाहिये. पण त्यामध्ये गुरमीत आणि देबीनाच्या हातात त्यांच्या मुलीचे छोटे-छोटे हात दिसून येत आहेत. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही आमच्या मुलीचे या जगात स्वागत करत आहोत. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी धन्यवाद’.
देबिना आणि गुरमीत (Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary) लग्नाच्या ११ वर्षानंतर आई-बाबा झाले आहेत. त्यांनी ही गुड न्यूज शेअर करताच चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीही त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत व्हिडिओला ९ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
गुरमीत आणि देबीना २०११ साली विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दोघांनी आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे ते आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता दोघेही त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाल्याने खूपच खूश आहेत.
प्रेग्नेन्सीदरम्यान देबीना आपल्या फोटोशूटमुळे फारच चर्चेत राहिली होती. तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या प्रेग्नेन्सीदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने चाहत्यांशी शेअर केले होते. तसेच या काळात ती योगा करतानाही दिसून आली होती. तिचा हा फोटोसुद्धा चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, ३ एप्रिल रोजी कॉमेडियन भारती सिंहसुद्धा आई झाली. तिने एका मुलाला जन्म दिला असून याबाबत भारती आणि तिचा पती हर्षने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती दिली. दोघांनी मॅटर्निटी फोटोशूटदरम्यानचा एक फोटो शेअर करत त्यांना मुलगा झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यावरही चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :
आशिकी फेम दीपक तिजोरींची मुलगी आहे फेमस बॉलिवूड अभिनेत्री, आलिया श्रद्धाही पडतील फिक्या, पहा फोटो
राजामौलींनी प्रेमासाठी तोडली सगळी बंधने, घटस्फोट झालेल्या ‘या’ फॅशन डिझायनरसोबत केलं आहे लग्न
‘हे कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसे घेऊन जातात’; सिद्धार्थ जाधवला फिल्मफेअर भेटल्यानंतर कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा