Sandeepan Thorat: सोलापूरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे सात वेळा काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार संदिपान थोरात यांचे निधन झाले आहे. सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
संदीपान थोरात यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. थोरात यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा व श्वासनविकाराचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना ११ मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आली होते.
शरद पवारांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून संदीपान थोरात यांची ओळख होती. तसेच गांधी घराण्याशी त्यांचे जवळचे नाते होते. संदीपान थोरात यांनी पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले. त्याचं मुळ गाव माढा तालुक्यातील निमगाव आहे.
संदीपान थोरात गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन संदीपान थोरात यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या पश्चात चार विवाहीत मुले, तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. संदीपान थोरात एक प्रतिष्ठित वकील होते.
संदीप थोरात एक प्रतिष्ठित वकील होते. संदीपान थोरात तरुण वयात काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले.१९७७ मध्ये काँग्रेसच्या पडझडीच्या काळात पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा मतदार संघातून संदीपान थोरात यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावर संदीपान थोरात यांची अढळ निष्ठा होती.
दरम्यान, १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. जेष्ठ नेते शरद पवार यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पंढरपुरात काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा संदिपान थोरात यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांचा पराभव झाला. त्यानंतर थोरात यांनी राजकारणाला रामराम ठोकला.
महत्वाच्या बातम्या
कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार दणका तर ठाकरे गटाला दिला मोठा दिलासा
पांड्याच्या ‘या’ चालीपुढे धोनीची कॅप्टन्सी फेल, श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात गुजरातने चेन्नईला हरवले
आव्हाडांच्या बॉडीगार्डची सुसाईट नोट सापडली, धक्कादायक खुलासे; मिडीया, पोलिसांना केले ‘हे’ आवाहन






