Share

लग्नाच्या वरातीत डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टर हदारले

crime

लग्न सोहळा म्हणजे आनंद… लग्नातील वरात म्हणजे तरुणांसाठी मेजवानीच.. मात्र याच आनंदाच्या भरात अनेक धक्कादायक घटनादेखील घडतात. अशीच एक भयानक घटना घडल्याच उघडकीस आलं आहे. लग्नाच्या वरातीत डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू झाला.

दुसरी धक्कादायक बाब म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्टमधून एक वेगळीच माहिती समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. याचबरोबर लग्नातील पाहुण्यांना देखील अचानक घडलेल्या या घटनेने जबर धक्का बसला आहे. तर जाणून घ्या नेमकं घडलं? पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय आले समोर?

ही घटना आहे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) उज्जैन येथील. लाल सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण अवघ्या 18 वर्षांचा आहे. तो उज्जैनच्या समीप ग्राम नारेला कला येथे राहतो. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाल सिंह मित्रांसह ताजपूर येथे लग्नासाठी गेला होता.

ताजपूर येथे हा लग्न सोहळा पार पडला. तसेच लग्नादरम्यान गावात मिरवणूक निघाली होती. या मिरवणूक लाल सिंहदेखील सामील झाला. तो आपल्या मित्रांसह डीजेच्या तालावर तुफान नाचला. मात्र याच दरम्यान काळाने त्याच्यावर घाला घातला. अचानक त्याची तब्बेत बिघडली.

नाचताना काही क्षणात तो जमिनीवर कोसळला. ही बाब लक्षात येताच लाल सिंह याला त्याच्या मित्रांनी तसेच नातेवाइकांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्याने जगाचा निरोप घेतला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अन् कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीने सर्वानाच आणखी एक जबर धक्का बसला. लाल सिंह याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्याचा हार्ट फेल झाला. ही बाब हैराण करणारी असल्याच डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर म्हणाले, मोठ्या आवाजाचा परिणाम थेट हृदयावर होतो. यामुळे हृदयाचे ठोके थांबतात आणि अशा घटना घडतात.

महत्त्वाच्या बातम्या
अंगावर वीज पडली म्हणून तरुणाला शेणाने गुंडाळले, एका तासानंतर नंतर जे घडले ते पाहून सगळेच हादरले
अजित पवार, दानवे, राणांसह ३७२ बड्या नेत्यांचा वीजबील थकबाकीचा आकडा आला समोर: वाचा यादी
हनुमानाचे नाव ऐकून रावण सुडाने पेटला असेल; राणांची भेट घेतल्यावर चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांवर संतापल्या
मोठी बातमी! मुंबईत LIC ऑफिसमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now