Share

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी झाली गायब, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा

marrige

सध्या लग्नसराई सुरू आहे. मोठ्या धूमधडाक्यात सर्वत्रच लग्न दणक्यात सुरू आहेत. 2 वर्ष करोना विषाणूमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी पासून कोरोना विषाणूचा कमी झालेला प्रसार पाहता आता सरकारने सर्व सुरू करण्यात परवानगी दिली आहे.

तर दुसरीकडे राज्यात धक्कादायक घटनांची मालिका देखील सुरूच आहे. अशीच एक राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्न तोंडावर आलं असतानाच नवऱ्या मुलीच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

वाचा नेमकं घडलं काय..?
अमरावती जिल्ह्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत तरुणी ही १९ वर्षीय असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे लग्न ६ जुलैला लग्न ठरलेले होते. मात्र टी लग्नाच्या आदल्या दिवशीच घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबियांच्या पाया खालची जमीनच सरकली.

मृत तरुणी ही मोबाइल घरी घेऊन घराबाहेर पडल्याने तिचा संपर्क देखील होऊ शकला नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र तरुणीचा कुठेच शोध लागला नाही. अखेर मृत तरुणीचे वडील संजय नेवारे यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार शिरजगाव पोलिसांत दाखल केली.

धक्कादायक बाब म्हणजे सात दिवसांनी म्हणजेच मंगळवारी तिचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोवारीपुराच्या मागील बाजूस असलेल्या नारायण पोटे यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या अंगावर अर्धवट कपडे असल्याचं आढळले. माझ्या मुलीची हत्या झाली आहे, असा खळबळजनक आरोप मृत तरुणीचे वडील संजय नेवारे यांनी केला. आता पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवरुन अजित पवार भडकले; शेलक्या शब्दात घेतला समाचार, वाचा काय म्हणाले..
गावात दोन हेलिपॅड पण शाळा, रस्ते, रूग्णालय नाही; उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना झापले, म्हणाले…
‘फक्त दोनच मुले जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही’- असदुद्दीन ओवैसी
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ खेळाडू बनणार रोहितचे शस्त्र, इंग्लंडला टाकणार संकटात

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now