रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातून अनेक देश त्याच्यांवर टीका करत आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यातच, आता हॉलिवूड अभिनेत्री अँनालिन मॅककार्डने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून तिने केलेल्या वक्तव्याने सध्या तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
अँनालिन मॅककार्डने व्हिडिओ द्वारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणते की जर मी पुतिन यांची आई असते तर ते एक चांगले व्यक्ती असते. तिच्या या विधानाने काही लोकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.
व्हिडिओमध्ये अभिनेत्री अँनालिन स्वत: लिहिलेली एक कविता म्हणून दाखवत आहे, ज्यामध्ये ती म्हणते की जर मी तुझी आई असते आणि जग खूप थंड असते तर, तुम्हाला उब देण्यासाठी मी माझा जीव दिला असता, तुम्हाला जीवन,सुख देण्यासाठी मी माझा जीव दिला असता. मला माफ करा मी तुमची आई नाही, तसेच म्हणते की मी जर तुमची आई असते तर तुम्हाला खूप प्रेम मिळाले असते, असे म्हणते.
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ 2 मिनिटे 20 सेकंदाचा आहे. मात्र, तिच्या या कवितेची सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडवली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये शांततेचे आवाहन करण्याचा तिने प्रयत्न केला खरा, मात्र तिच्यावरच तो डाव उलटला आहे.
Dear Mister President Vladimir Putin… pic.twitter.com/LbDFBHVWJf
— AnnaLynne McCord (@IAMannalynnemcc) February 24, 2022
तिच्या व्हिडिओवर लोकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी टीका केली, तर काही लोकांनी त्याच्या व्हिडिओचे कौतुकही केले आहे. एका युजरने लिहिले की, हा माझ्यासाठीही वाईट दिवस आहे, पण मी असे मजेदार व्हिडिओ बनवणार नाही. दुसऱ्या एका यूजरने लिहिले की तू पहिली महिला कॉमिक आहेस जिने मला हसवले. आणखी एका युजरने टोमणे मारत लिहिले, तुझ्या या कवितेने रशिया युक्रेनवरील हल्ला नक्कीच थांबवेल.
रशियाच्या या हल्ल्यात किमान 137 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दुसर्या महायुद्धानंतर युरोपियन राष्ट्रावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर रशियाने गुरुवारी जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे आक्रमण सुरू केले. यूएस आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कीव ताब्यात घेणे आणि सरकार पाडणे हे रशियाचे लक्ष्य आहे.