औरंगाबाद(Aurangabad): गुरुवारी कृष्ण जन्माष्टमीनंतर राज्यात सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. गेले काही वर्ष कोरोनाच्या लाटेमुळे कोणताही सण जल्लोषात साजरा करता आला नाही. कोरोनानंतर यावर्षी एवढ्या मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करता आला आहे. यावेळी शहरातील चौका-चौकात तरुणांची गर्दी पाहायला मिळत होती.
सर्वत्र उत्साहाने कार्यक्रम चालू असताना औरंगाबादमध्ये याच दहीहंडी उत्सवाला एका घटनेने गालबोट लागलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी शहरातील कॅनॉट परिसरात दोन गटात वाद झाला. या वादात तरुणांनी एकमेकाला चाकूने मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत एक तरुणदेखील जखमी झाला आहे.
इतर शहरांप्रमाणे औरंगाबाद मध्येही भरपूर ठिकाणी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरु होता. ठिकठिकाणी लोकांची भरपूर गर्दी जमली होती. सर्व ठिकाणी शांततेत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला असताना कॅनॉट परिसरात छोट्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला.
रात्री १० वाजताच्या सुमारास धक्का लागला या शुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. याच मारहाणीत एका तरुणाच्या मांडीत चाकू खुपसला गेला. चाकू खुपसताच दोन्ही गटातील तरुण तेथून पळाले. जखमी तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार होत आहे. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर, बजरंग चौक, गुलमंडी, कोकणवाडी चौक, औरंगपुरा, सिडको, कनॉट, निराला बाजारसह अनेक ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम जल्लोषात सुरु होता. बहुतांश ठिकाणी डीजेच्या तालावर तरुण-तरुणी नाचत होते. काही ठिकाणी सिनेअभिनेत्री-अभिनेतेसुद्धा आलेले होते.
१८ तारखेला मुख्यमंत्र्यांनी गोविंदांच्या बाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. दहीहंडीला आता खेळ म्हणून जाहीर केले आहे. साहसी खेळात दहीहंडी सामील करत मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. प्रो कब्बडी प्रमाणेच आता प्रो गोविंदा स्पर्धासुद्धा राबवण्यात याव्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar : गोविंदांना आरक्षण देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर अजित पवारांनी घेतला आक्षेप, म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी….
Dahihandi: दहीहंडी उत्सवात नाचता नाचताच गोविंदाचा मृत्यू; संपुर्ण सोहळ्यावर पसरली शोककळा
Devendra Fadanvis : “खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार?”
Mahavikas Aghadi : विधानपरिषद सभापती निवडीत भाजप-शिंदेंच्या अडचणीत वाढ, ‘मविआ’ला मात्र होणार फायदा