Share

Disha Vakani: दयाबेनला खरंच कॅन्सर झालाय का? आता भावानेच केला खुलासा, म्हणाला, तिने शो सोडल्यापासून..

Disha Vakani, Mayur Vakani, Cancer,/ टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील दयाबेन या व्यक्तिरेखेने घराघरात आपला ठसा उमटवणाऱ्या दिशा वाकानीला घशाचा कर्करोग असल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ‘दयाबेन’ या व्यक्तिरेखेसाठी त्याच्या वेगळ्या आवाजामुळे तिला घशाचा कर्करोग झाल्याचे बोलले जात आहे.

सध्या या बातमीवर दिशाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण शोमध्ये सुंदर लालच्या भूमिकेत दिसणारा तिचा भाऊ मयूर वाकानीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने मीडिया रिपोर्ट्स फेटाळून लावत दिशा पूर्णपणे निरोगी असल्याचा दावा केला आहे.

दिशा वाकानी घशाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याची बातमी सगळीकडे पसरत आहे. दिशाने 2010 मध्ये दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये हे म्हटले गेले आहे. त्यावर्षी दिशाने तिच्या दयाबेन या पात्राच्या वेगळ्या आवाजाविषयी सांगितले होते की, हे एक लोकप्रिय पात्र आहे. या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असलेल्या आवाजामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आता अशा मीडिया रिपोर्ट्सनंतर दिशाचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. दिशा वाकानीचा भाऊ मयूर वाकानी याने प्रसारमाध्यमांच्या सर्व वृत्तांचे स्पष्टपणे खंडन केले आणि दिशाला घशाचा कर्करोग असल्याच्या या बातमीत तथ्य नाही असे सांगितले. वृत्तसंस्थेशी केलेल्या संभाषणात तो म्हणाला, अभिनय क्षेत्रातील कलाकारांबद्दल अनेक अफवा पसरतात.

दिशा पूर्णपणे निरोगी आहे आणि त्यातील काहीही खरे नाही. तिने शो सोडला तेव्हापासून तिच्याबद्दल अशा बातम्या रोज ऐकायला मिळतात पण दिशाच्या चाहत्यांनी अशा कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये. तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालनेही दिशाच्या प्रकृतीशी संबंधित या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

ती म्हणाली, मी दिशाशी बोलत असते. या वृत्तांमध्ये काही तथ्य आहे, असे मला वाटत नाही. तसे असते तर मलाही कळले असते. ऑगस्ट अखेरपर्यंत आम्ही बोलत होतो, कारण आम्ही दोघीही एकाच ठिकाणचे आहोत. मला वाटतं दिशाबद्दल फक्त या अफवा पसरवल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनचे पुनरागमन, या अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब
तारक मेहताच्या चाहत्यांना धक्क्यावर धक्के! थांबवली तारक मेहता आणि दयाबेनची कास्टिंग, कारण..
Disha Vakani: मालिकेत घशातून आवाज काढावा लागल्यामुळे दयाबेनला झाला कॅन्सर? जेठालालनेच सांगीतले सत्य

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now