Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तळोजात कारागृहात असणाऱ्या इक्बालला अचानक त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्याला लगेच हलवण्यात आल्याची माहिती आहे.
जेलमध्ये एका प्रकरणासंदर्भात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आतमध्ये होता. त्याच्या छातीत दुखू लागल्याने तळोजा कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
इक्बाल कासकर याला फेब्रुवारी महिन्यातच अंमलबजावणी संचालनालय (ईडीने) मनी लॉन्ड्रीच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. आधीच तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या इक्बालची त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर आणि त्याच्या साथीदारांवर एनआयएने गुन्हा दाखल केला होता. त्याचा भाऊ इक्बाल कासकरवर पण अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या संदर्भात खटले देखील चालू आहेत.
अधिक माहितीनुसार, ईडीच्या ताब्यात असलेल्या इक्बाल कासकरचे अनेक मित्र, नातेवाईक यांच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. कासकरने केलेल्या मनी लॉन्ड्री प्रकरणात काही पुरावे हाती लागतात का? या दृष्टीने ईडीने या धाडी टाकल्या होत्या.
अचानक इक्बाल कासकरची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या प्रकरणात पुढे ईडी कोणत्या प्रकारे तपास करते? हे पाहावे लागेल. सध्या इक्बाल कासकरच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याच्या संबंधित व्यक्तींच्या चिंतेत वाढ झाल्याचे बोलले जाते.
महत्वाच्या बातम्या-
Gulabrao Patil : बंड करायच्या आधीच उद्धव ठाकरेंकडे २० आमदारांना घेऊन गेलो होतो पण.., गुलाबरावांचा मोठा खुलासा
कोकणात राडा! निलेश राणेंनी हात जोडून सगळ्या ग्रामस्थांची मागीतली माफी; वाचा पुर्ण प्रकरण…
Aditya Thackeray : गुलाबरावांच्या गावात जाऊन आदित्य ठाकरेंनी केली त्यांची पोलखोल, म्हणाले, त्यांनीच मला गद्दारीमागचं…