Share

दाऊदने फोन केला म्हणूनच मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने उडाली खळबळ

chandrkant patil

‘राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असा दाऊदचा फोन आल्‍याने मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, असा खळबळजनक आरोप भाजप प्रदेश अध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. धडक मोर्चा सुरू होण्‍याआधी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्‍तव्‍य केल्‍याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपा नेते आक्रमक झाले असून, आज भाजपाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे अनेक नेते तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दाऊदने फोन केला म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, असा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाहीये, असे पाटील म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असणाऱ्यांना मदत करणाऱ्या नवाब मलिकांसारख्यांना हे सरकार पाठिशी घालण्याचे काम करत आहे. जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा एल्गार पाटील यांनी केला.

यावेळी बोलताना नवाब मलिक यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी देखील मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मलिक कारागृहात असताना मंत्रीपदावर आहेत आणि हे योग्य नाही त्यामुळे मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, असेही देखील पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, ‘जो माणूस दाऊदबरोबर व्यवहार करतो तो मंत्रिमंडळात बसूच कसा शकतो? हसीना पारकरसोबत बैठका करतो त्याला मंत्रिमंडळात स्थानच कसं मिळतं?, असे सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केले. आता मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
काँग्रेसला मोठा धक्का! तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या नेत्याने सोडला पक्ष; सोनीयांना पत्र लिहीत म्हणाला…
‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? शोधता शोधता होईल डोक्याचा भुगा, ९९% लोकं फेल
‘कपिल शर्मा शो’मधील दादीने म्हणजेच अली असगरने का सोडला होता शो? स्वत:च केला मोठा खुलासा
शारदाच्या किंचाळ्यांनी एका काश्मिरी पंडितला रात्रभर झोपू दिले नाही, काश्मिर फाईल्सचा असाही परिणाम

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now