ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरवर ‘पुष्पा’ चित्रपटावर खूपच फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तो दररोज त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ‘पुष्पा’ चित्रपटासंदर्भात अनेक व्हिडिओ शेअर करत आहे. नुकतीच त्याने असाच एक त्याचा रिक्रिएट व्हिडिओ (david warner recrate video on pushpa) शेअर केला आहे. यामध्ये डेव्हिड ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या स्टाईलला कॉपी करताना दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्यावर भन्नाट कमेंट करत आहेत.
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या चेहऱ्याच्या ठिकाणी डेव्हिड वॉर्नरचा चेहरा लावण्यात आलेला आहे. तसेच व्हिडिओत दिसत आहे की, डेव्हिड अल्लू अर्जूनसारखा वेगाने पळत आहे आणि कुऱ्हाडीने चंदनाचे लाकूड तोडत आहे. तसेच पोलिसांना चकमा देऊन पळत पाण्यातून बाईक चालवतानाही तो या व्हिडिओत दिसत आहे.
व्हिडिओ शेअर करत डेव्हिडने लिहिले की, ‘काश मी अल्लू अर्जून असतो तर अभिनय खूप सोपा केला असतो’. तसेच त्याने या पोस्टमध्ये अल्लू अर्जूनलाही टॅग केला आहे. डेव्हिडचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीसुद्धा कमेंट करत आहेत.
डेव्हिडच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिले की, ‘तू क्रिकेट सोडून भारतीय सिनेसृष्टीत का येत नाहीस?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘डेव्हिड तू पुष्पा २ मध्ये डेब्यू करणार आहेस का?’ तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियन पुष्पा, झुकेगा नही’. यासोबत डेव्हिडच्या या व्हिडिओवर अनेक तमिळ-तेलुगू लोकांचेही कमेंट पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डेव्हिडने या चित्रपटातील डायलॉग आणि डान्सवर व्हिडिओ तयार केले होते. यामध्ये त्याने पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यातील हुकस्टेपवर व्हिडिओ बनवला होता. तसेच त्याच्या तिन्ही मुली पुष्पा चित्रपटातील ‘सामी सामी’ या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. त्याच्या या व्हिडिओंनाही भारतीय प्रेक्षकांची फार पसंती मिळाली होती.
दरम्यान, पुष्पा चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना उलटला तरीही त्याची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. अनेकजण या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स, अॅक्शन सीन्सवर रील्स बनवत आहेत. पुष्पाचा हा फिवर भारतीय क्रिकेटर्सवरही चढला आहे. शिखर धवन, इरफान पठान, रविंद्र जडेजा, सूर्य कुमार यादव तसेच ईशान किशन या क्रिकेटर्सनेही पुष्पा चित्रपटावर व्हिडिओ बनवले आहेत. त्यांचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अपूर्वा पुन्हा झळकणार ‘या’ मालिकेत, साकारणार ऐतिहासिक भूमिका
लेक चालली सासरला! अलका कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, पहा खास फोटो
‘पुष्पा’मध्ये ‘झुकेगा नहीं’ म्हणत दाढीखालून हात फिरवण्याची कल्पना कशी सुचली होती? अल्लू अर्जुनने केला खुलासा