david miller share fan video | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय क्रिकेटचा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा संघाचा फलंदाज डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरं तर, डेव्हिड मिलरची जवळची फॅन ऍनीचा कॅन्सरने मृत्यु झाला आहे.
डेव्हिड मिलरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करून ऍनीला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच एक इंस्टाग्राम पोस्टही शेअर केली आहे. डेव्हिड मिलरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या चाहतीला खूप मिस करणार आहे. तु खुप भारी आहेस. तु शेवटपर्यंत खुप आनंद राहून संघर्ष करत राहीलीस.
पुढे तो म्हणाला की, तुझे प्रत्येक माणसाने कौतूक केल आहे. कारण तु तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींना हसत हसत सामोरे गेली होती. मला आयुष्यातील प्रत्येक क्षण जगायला तू शिकवलंय. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खुप खास होता. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.
मिलरने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओही शेअर केला आहे. मिलरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, RIP, माझी छोटी रॉकस्टार. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या फोटोंमध्ये, ऍनी मिलरसोबत खेळताना दिसत आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1578802221005025280?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1578802221005025280%7Ctwgr%5E49fb2bf7312f449e2c42095b7d65829612f57de7%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Findia-vs-south-africa-odi-series-david-miller-fan-ane-dies-of-cancer-star-cricketer-share-emotional-post-tspo-1552425-2022-10-09
काही फोटोंमध्ये तिने मिलरची जर्सी घातलेली आहे. तर काही फोटोंमध्ये तिने मिलरचे हेल्मेट घातलेले आहे. तसेच काही फोटोंमध्ये ती डेव्हिड मिलरसोबत क्रिकेट खेळतानाही दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ खुप भावूक करणारा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
दरम्यान, डेव्हिड मिलर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या सध्याच्या दौऱ्यावर त्याने खुप चांगली कामगिरी केली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात मिलरने शानदार शतक झळकावले. त्यानंतर लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मिलरने नाबाद ७५ धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
महत्वाच्या बातम्या-
Shinde : शिंदे-फडणवीस सरकार धोक्यात..! सत्तास्थापनेबाबत माहिती अधिकारात झाला धक्कादायक खुलासा
shivsena : ‘अपेक्षेप्रमाणे धनुष्यबाण गोठवला.. नावही बदलावं लागणार.. वाघांच्या भांडणात कमळाबाईचं फावलं..!’
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंसोबत खोटेपणा? पुरावे देऊन सुद्धा आयोग आता म्हणतय की..