Share

थंड डोक्याने सुनियोजित कट रचत सुनेने सासूचा काढला काटा; आणि… वाचा संपूर्ण थरार

yavatmal

घर म्हणलं की भांड्याला भांड लागणारच… त्यातही सासू – सुनेचे वाद होणे हे काही नवीन नाही. आपल्या घरापासूनच ही एक जीवंत उदाहरण आहे. काहीना काही गोष्टीवरून सासू – सुनेत खटके उडतात. असाच काहीसा प्रकार यवतमाळमधील पोजरवार कुटुंबात सतत सुरू होता. मात्र ही वाद टोकाला गेले अन् होत्याचं नव्हतं झालं. (daughter in law firing on mother in low)

सरोज पोजरवार हिची आपल्या सासूबरोबर नेहमी भांडणं होत होती. यातूनच सरोजने आपल्या सासूला संपवण्याचा कट रचला. मिळालेल्या माहितीनुसार, पोजरवार यांच्या घराजवळ निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर राहतात. ३ दिवसांपूर्वी सरोजने शिताफिने त्यांचं रिव्हॉल्व्हर चोरलं. या चोरीची तक्रारही दाखल झाली होती.

दरम्यान, सासूची सुनेने हत्या केल्याची घटना देखील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील शिवाजीनर येथे घडली आहे. चारित्र्यावरून सासू सुनेला टोमणे मारत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यातूनच सुनेनं टोकाचं पाऊल उचलत सासूची हत्या केली. त्याचबरोबर सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमी शुल्लक कारणांवरून वाद देखील होत होते.

सुनेने सासू घरात पूजा करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनेने सासू घरात पाय घसरून पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला. आशा यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

मात्र शवविच्छेदनात त्यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी आढळून आली. मग पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवली आणि सरोजचा बनाव उघड झाला. हत्येसाठी रचलेला कट ऐकून पोलिसही हैराण झाले. सासू सुनेचं किरकोळ भांडण थेट हत्येपर्यंत गेल्यानं यवतमाळ जिल्हा हादरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मला अजून 105 लेकरांची आई व्हायचयं; वर्षात 22 मुलांना जन्म दिलेल्या महिलेची वाचा अनोखी गोष्ट
नाद केला भावा तू! ना घोडा, ना कार थेट JCB वरून नवरदेव घेऊन आला वरात; वाचा एका लग्नाची नादखुळा गोष्ट
दिदी मला जेवन करायचय थोडे पैसे देशील का? म्हणणाऱ्या मुलीला मदत न केल्याने रश्मिकाला लोकांनी झापले
वयाच्या २१ व्या वर्षीच तुमची मुलगी बनेल लखपती, फक्त ४१६ रुपये गुंतवा आणि मिळवा ६५ लाख

इतर क्राईम राज्य

Join WhatsApp

Join Now