या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सून मनिषा, तिची आई आणि भावाला अटक केली आहे. तर जाणून घेऊया सविस्तर.. नेमकं झालं काय? घडल्या प्रकारानंतर पोलिसांनी काय घेतली अॅक्शन?
सासु सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना हरयाणातील सोनीपत गावातील सांदल खुर्द येथील असल्याचं बोललं जातं आहे. येथील एका सुनेने सासुला चक्क एक पोळी जास्त खाल्ली म्हणून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर विधवा इशवंती (७५) हिने सोनीप पोलिसांकडे मारहाणीबाबत तक्रार केली होती. यात तिने मुलगा मुकेशची पत्नी मनिषा ही छळ करीत असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी घटनेची दखल घेत सून मनिषा, तिची आई आणि भावाला अटक केली आहे.
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सासूने तक्रातीत म्हंटले की, ‘सूनेने पाच दिवसांपूर्वीच्या चपात्या खायला दिल्या होत्या. यानंतर नातू आणखी एक पोळी घेऊन आला. त्याने आग्रह केला म्हणून चपाती खाल्ली. नंतर ही गोष्ट सूनेला कळताच ती भांडू लागली आणि मारहाण केली, असे तक्रारीत सासूने म्हंटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच सून मनिषाने पती मुकेश आणि अन्य सदस्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. ती माहेरीच राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती सासरी आली होती. तर दुसरीकडे सासू इशवंतीने सुनेवर मारहाणीचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.