महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सर्वच कलाकार गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा उद्याचा भाग सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आला आहे. या भागात दत्तूने एक निबंध लिहला आहे. या निबंधावर बाईनी प्रतिक्रिया देत दत्तूचा निबंध सर्वांना वाचून दाखवला आहे.
बाईंनी दत्तुला माझा आवडता प्राणी याविषयावर निबंध लिहायला लावला होता. यावर दत्तुने माझा आवडता प्राणी ढेकून असल्याचे सांगितले आहे. पुढे दत्तने आपल्या निबंधात लिहले आहे, माझी आई बाबांना ढेकूनच म्हणते. त्याचा हा निबंध ऐकून प्रेक्षक पोट धरुन हसले आहेत.
https://www.dailymotion.com/video/x88xlud
यानंतर दत्तूला विचारण्यात येते तुला मोठे होऊन काय बनायचे आहे. त्यावर तो म्हणतो मला पाटील सरांसारखे होयचे आहे. यावर दुसरा विद्यार्थी म्हणतो, बघा बाई हा कशी दळभर्दी उत्तर देतोय. त्याची ही प्रतिक्रिया ऐकून बाई ही अवाक झाल्या आहेत. यानंतर दुसऱ्या भागात विशाखा सुभेदार आपल्या मुलीची बोलणी करण्यासाठी मुलाच्या घरी गेल्या आहेत. इथेही आपल्याला धमाल मस्ती पाहिला मिळते.
विशाखा यांना त्यांच्या भावाचे गाव विचारण्यात येते यावर त्या चिपळून असे सांगतात. हे ऐकताच मुलीकडचे तुम्ही ही तिथलेच का? असे विचारतात. परंतु छे ओ मी नाही… असे विशाखा उत्तर देतात. यावेळी लगेच मुलीकडचे वाटलच होत. बघूनच कळतय.. अशी प्रतीक्रिया देतात. त्यांची ही प्रतीक्रिया ऐकून सर्वांनाच हसू येते.
असे अनेक लहान मोठे प्रसंग साकारत कलाकार काही ना काही तरी मनोरंजाचा धमाका घेऊन येतात. त्याच्या या धमाक्याने वातावरणच बदलून जाते. हास्य जत्रेचा हा आठवडा सगळ्यात जास्त मनोरंजक ठरणार आहे. कारण की, सर्व कलाकारांनी आता प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याचा विडा उचलत वेगवेगळे कारनाचे समोर आणण्याचे ठरविले आहे.
त्याच्या या कारनाम्यांचा प्रेक्षक ही टेन्शन विसरुन आनंद घेताना दिसत आहेत. हास्य जत्रेच्या पुढील भागात प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आणण्यात येणार आहे. परंतु याची माहिती कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी अद्याप समोर आणलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
माझ्या ऑफीसमध्ये एक घड्याळ होतं त्यात कॅमेरा लावला होता’, प्रवीण चव्हाण यांचा गौप्यस्फोट
मुलीने आयोजित केलेल्या मैफिलींना राहुल देशपांडे जातो पण.., शरद पवारांनी बोलून दाखवली नाराजी
शेअर छोटा फायदा मोठा! ३५ पैशांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार मालामाल, १ लाखांचे झाले १० कोटी
राजपूत कुटुंबात जन्म, खासदार झाल्यानंतर झाला होता जीवघेणा हल्ला, वाचा योगींची संघर्षमय कहाणी