जय मल्हार आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमधून आपली नविन ओळख बनवणारी अभिनेत्री ईशा केसकर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. या चर्चेचे कारण आहे की, ईशा मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत आहे. या अभिनेत्यांने नुकताच आलेला मराठी चित्रपट पावनखिंड यामध्ये आपली भूमिका साकारली आहे.
पावनखिंडमध्ये भूमिका साकारलेल्या या कलाकाराचे नाव आहे ऋषी सक्सेना. काहे दिया परदेस या मालिकेतून ऋषी सर्वांच्या भेटीला आला होता. त्यानंतर त्याने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात, मालिकेत, चित्रपटात काम केले. सांगण्यात येते की, ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती.

या पहिल्या भेटीतच ईशाला ऋषी आवडू लागला होता. त्यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांच्यातील संवाद वाढला. त्यानंतर ते एका कॉफी डेटवर सुध्दा गेले. खरे तर यानंतरच दोघांमधील लव्हस्टोरीला सुरुवात झाली. आता हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
याबाबत नेटकऱ्यांनी देखील ईशाला अनेक प्रश्न विचारले आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुध्दा रंगू लागल्या आहेत. ईशा सारखाच ऋषीचा देखील मोठा फॅन वर्ग आहे. त्याने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या ऋषी नुकत्याच आलेल्या पावनखिंड चित्रपटात दिसला आहे.

या चित्रपटाने त्याला चांगलीच प्रसिध्दी मिळवून दिली आहे. त्याचबरोबर मंगलाष्टक वन्स मोअर, याला जीवन ऐसे नाव, वुई आर ऑन होऊन जाऊ द्या, सी आर डी, हॅलो नंदन अशा अनेक चित्रपटांमध्ये ईशाने काम केले आहे. जय मल्हारमध्ये बानूच्या भूमिकेत दिसलेल्या ईशाचा सोशल मिडीयावर मोठा फॅन वर्ग आहे.
ती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. वेगवेगळे फोटो टाकून आपल्या सध्याच्या आयुष्याबदल ती काही ना काही सांगत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत असतात.






