Share

eknath shinde : एकनाथ शिंदेची खेळी! मेळाव्यासाठी भाजप-मनसे नेत्यांना निमंत्रण नाही, वाचा नेमकं काय प्रकरण?

Devendra Fadanvis Eknath Shinde

eknath shinde : यंदाचा दसरा मेळावा चर्चेचा विषय बनला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे पार पडणार आहेत. यामुळे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मेळाव्यांकडे लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मेळावे जरी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे असले तरी भाजप आणि मनसेच्या नेत्यांकडे देखील अवघ्या राज्याचं लक्ष्य आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला भाजपचे नेते जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या मेळाव्याला कोणा-कोणाला आमंत्रण असणार? हे देखील महत्त्वाचे आहे.

अशातच एक वेगळी माहिती समोर येतं आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी भाजपच्या आणि मनसेच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून मिळाली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मेळाव्यासाठी फक्त शिवेसनेचे नेते, दसरा मेळावा फक्त शिवेसनेचा आणि हीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्यासाठी शिंदे गटाने ही नवीन खेळी खेळल्याचं बोललं जातं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही खेळी आता यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, यंदाचा दसरा अनेक मुद्यांनी चांगलाच चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे दसऱ्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत थांबणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे हे पुण्यात असणार असल्याची माहिती मिळाली आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now