Share

shiv sena : शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार; हायकोर्टाने दिली दसरा मेळाव्याला परवानगी

udhav

shiv sena : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. दसरा मेळाव्याचा मुद्दा थेट मुंबई हायकोर्टात गेला होता. अखेर कोर्टाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. यामुळे आता शिवाजी पार्कमधील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे सभा घेणार हे अंतिम झालं आहे.

आज दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्य़े ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. अवघ्या राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं. अखेर ठाकरे गटाकडून निर्णय लागला आहे.

याचबरोबर मुंबई महापालिकेने कायदा-सुव्यवस्थेचं कारण सांगत दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट दोघांच्या बाजून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच मुंबई महापालिका देखील कोर्टात गेली होती.

आज अखेर सर्व याचिकांवर कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेत मुख्य शिवसेनेला दसरा मेळावासाठी परवानगी दिली. ठाकरे गटाला परवानगी देताना न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन घेतले. तसेच दोन ते सहा ऑक्टोबर शिवाजीपार्क वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी कोर्टात सांगितलं की, ‘कोरोना काळात आम्ही शिवाजी पार्क मैदान मेळाव्यासाठी मागितलं नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची हा मुद्दा इथे नाही. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी.’

महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी 
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now