Share

अखिलेश यादवांनी शब्द फिरवला, भाजपला असा चकवा दिला की युपीच्या राजकारणात उडाली खळबळ

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी भाजपला धक्क्यावर धक्का बसत आहे. अनेक नेते भाजप पक्षाला रामराम ठोकत आहेत आणि विरोधी पक्षांमध्ये सामिल होत आहेत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी शनिवारी असं जाहीर केलं होतं की भाजपमधील एकाही नेत्याला ते पक्षात प्रवेश देणार नाहीत. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपला शब्द फिरवला.

स्वामी प्रसाद मौर्य आणि अनेक आमदारांनंतर आता योगी सरकारमध्ये माजी मंत्री दारा सिंह चौहान यांनीही कमळाचे फूल सोडून सायकलवर बसण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. दारा सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.

आता अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत ते समाजवादी पक्षात सहभागी झाले आहेत. यूपीच्या पूर्वांचल भागात सायकलचा वेग वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. सपामध्ये प्रवेश करताच दारा सिंह चौहान यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, सन 2017 मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा सबका साथ सबका विकास असा नारा देण्यात आला होता, मात्र सर्वांचा विकास होण्याऐवजी मोजक्याच लोकांचा विकास झाला.

ते म्हणाले, या राज्यात राहणाऱ्या काही लोकांचा विकास झाला आणि बाकीच्या लोकांना ते होते तशा परिस्थितीत सोडण्यात आले. लोकांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र रचले जात असताना देश स्वावलंबी होईल का? असा प्रश्न दारा सिंह चौहान यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

केंद्र सरकारच्या योजनांवर हल्लाबोल करताना चौहान म्हणाले, ‘गरिबांना थोडेफार अन्न, रेशन आणि लालूच देऊन त्यांची फसवणूक आणि गुलाम बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे, मात्र आता गरीब आणि मागासलेल्या समाजातील लोक या भानगडीत पडणार नाहीत. ते म्हणाले, मागील निवडणुकीत मागास, दलित, रस्त्यावर फिरणाऱ्या बेरोजगार तरुणांनी भाजपला पूर्ण पाठिंबा दिला.

त्यांच्या डौलदार पिकांना शेतकऱ्यांनी साथ दिली होती, मात्र या थंडीत घरी आराम करायचा सोडून जनावरांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात खाट टाकून बसले आहेत. दारा सिंह चौहान म्हणाले, ‘शिक्षक भरतीच्या बाबतीत लोकांना उन्हात, थंडीमध्ये आणि पावसात लाठ्या-काठ्या मारल्या जात आहेत. आरक्षणाचा खेळ चालवला असून संविधानाशी छेडछाड करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

महत्वाच्या बातम्या
रोहित शर्मा नाही, तर ‘हा’ स्टार खेळाडू बनू शकतो भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार; नाव वाचून बसेल धक्का
जिद्दीला सलाम! आजारी वडिलांच्या उपचारासाठी देशभर धावत आहेत तिन्ही बहिणी
किरण मानेंनी महीला कलाकारांशी गैरवर्तन केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढले; स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण
‘विराटने असा निडर संघ तयार केली की जो..,’ कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर जय शाह यांची प्रतिक्रिया

राजकारण

Join WhatsApp

Join Now