एखाद्या गोलंदाजासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा फलंदाज त्याची स्तुती करतो पण तो फलंदाज सचिन तेंडुलकर असेल तर काय बोलावे. गतवर्षीचा पर्पल कॅपधारक हर्षल पटेल डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी जरी त्याने आपला फॉर्म उशिरा दाखवला असला तरी सध्या तो १२ सामन्यांत १८ विकेट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे आणि सामन्यानुसार कामगिरी करत आहे.(dangerous bowler in death overs, Sachin Tendulkar praised)
क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्या सचिन तेंडुलकरने त्याच्या गोलंदाजीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पटेल हा भारतासाठी प्रतिभावान गोलंदाज ठरू शकतो, असा सचिनला विश्वास आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सचिनने पटेलचे वर्णन डेथ ओव्हर्समधील सर्वात शक्तिशाली गोलंदाजांपैकी एक केले आहे.
सचिन म्हणतो की, पंजाबला बोर्डावर फक्त २०९ धावा करता आल्या, हे केवळ हर्षल पटेलमुळेच. प्रत्येक सामन्यात त्याची गोलंदाजी सुधारली आहे कारण तो आपली विविधता सुंदरपणे लपवू शकतो. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मला वाटते की तो अग्रगण्य खेळाडूंपैकी एक आहे. तो डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यात माहिर आहे.
१३ मे रोजी पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, जानी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टन ज्या प्रकारे फलंदाजी करत होते, आणि जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज यांच्याविरुद्ध शानदार फटके मारत होते. त्या परिस्थितीत हर्षल पटेल नसता तर आरसीबीचे त्या सामन्यात पुनरागमन अवघड झाले असते. त्या सामन्यात पटेलने ४ षटकांच्या गोलंदाजीमध्ये ३४ धावांत ४ बळी घेत पंजाब संघाला २०९ धावांवर रोखले.
मात्र, बंगळुरूची फलंदाजी फ्लॉप झाली आणि संघाला केवळ १५५ धावा करता आल्या आणि पंजाबने हा सामना ५४ धावांनी जिंकला. ज्या सामन्यात हेझलवुडने ४ षटकात ६४ धावा दिल्या आणि मोहम्मद सिराजने २ षटकात ३६ धावा दिल्या, पटेलने केवळ ८.५० च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली. गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही हर्षल पटेलची भूमिका सर्वाधिक प्रभावी ठरेल.
महत्वाच्या बातम्या-
रविंद्र जडेजाला बाद केल्यानंतर हर्षल पटेलने केला जल्लोष, दोन वर्षांनंतर घेतला असा बदला
रियान पराग आणि हर्षल पटेलच्या वादात चुक कोणाची? सोशल मिडीयावर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
शेवटच्या बाॅलवर षटकार मारताच चिडला हर्षल पटेल; मैदानावरच रियान परागच्या अंगावर धावून गेला
मी जेव्हा तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा.., हर्षल पटेलची बहिणीसाठी भावूक पोस्ट, वाचून डोळे पाणावतील