Share

Sangali: गणपती समोर सिनेमातील गाणी लाऊन डान्स करणे चुकीचे, ते बंद करा; कालिचरण महाराजांनी ठणकावले

kalicharan maharaj

सांगली(Sangali): श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर सोमवारनिमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली. सुरुवातीला श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते सात गड आणि अकरा नद्यांच्या पाण्याची आणि कावडची पूजा करण्यात आली.

यावेळी श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच शिवतांडव स्तोत्र पठन झालं. त्यानंतर या कावड यात्रेस प्रारंभ झाला. नद्यांच्या पाण्याने श्री क्षेत्र संगमेश्वर येथे मंदिरात संगमेश्वरास अभिषेक करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली.

यावेळी कालिचरण महाराज म्हणाले की, गणपती उत्सव जवळ आला आहे. आपण गणपतीचे पूजन कसे करतो, त्याला निरोप कशा पद्धतीने देतो याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण किती सन्मानाने निरोप देतो, पण गणपतीला तेवढा सन्मान का देत नाही? गणपती समोर चित्रपटाची गाणी लावली जातात. गणपती विसर्जन मिरवणुकीतसुद्धा तशीच गाणी व नृत्य सादर केले जातात. या गोष्टी चुकीच्या आहेत.

परमेश्वराला मनातून मानलं पाहिजे. मनाने जर आपण परमेश्वर मानला नाही, तर शरीरात राक्षसी प्रवृत्ती निर्माण होते. तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यानेही माणसाला परमेश्वराची कृपा लाभते. सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन यात्रेला सुरवात झाली. कालीचरण महाराजांच्या हस्ते शिवरायांना हारार्पण करण्यात आले.

कावड पूजा आटोपल्यानंतर कालीचरण महाराजांनी उपस्थित असलेल्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी शिवतांडव स्तोत्र सादर केले. गोंधळाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. गोंधळाचा कार्यक्रम चालू असताना पाऊससुद्धा चालू होता. भरपावसात तरुण पोरांनी गोंधळाच्या कार्यक्रमाच्या वेळी ठेका धरला. ही यात्रा शिवतीर्थ ते हरिपूर येथील संगमेश्वरपर्यंत यात्रा काढण्यात आली.

कृष्णा नदीसह शिवनेरी, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, अजिंक्यतारा, प्रतापगड अशा ७ गडांचे व गंगा, नर्मदा, भीमा, नीरा, कृष्णा, कोयना, सावित्री आदी ११ नद्यांचे पाणी कावड पूजेसाठी आणण्यात आले होते. प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहरलाल सारडा, लक्ष्मण नवलाई आदी उपस्थित होते. माजी अध्यक्ष मनोहरलाल सारडा, लक्ष्मण नवलाई आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदींनंतर फडणवीसच सक्षम नेतृत्त्व; फडणवीसांना पुण्यातून दिल्लीला पाठवा; ब्राह्मण महासंघाची मागणी
होमपीचवर शहाजीबापू पाटलांना शिवसेना करणार चारीमुंड्या चीत; खुद्द उद्धव ठाकरे मैदानात
इंदूरीकर महाराज पुन्हा अडचणीत; भडकलेल्या गावकऱ्यांचा थेट पोलिस ठाण्यात ठिय्या
गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now