Share

रंगाचा बेरंग ! सोसायटीच्या धुलिवंदनात बेधुंद होऊन नाचला, घरी पोहोचल्याच्या थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू

crime

देशभरात होळी-रंगपंचमीची (Holi 2022)  धूम पाहायला मिळाली.  प्रत्येक जण रंगामध्ये स्वतःला रंगवून घेतो आहे. परंतू अनेकदा होळीचा सण साजरा करताना काही जण भान हरपतात, अशामुळे काहींना प्राण गमवावे लागतात. अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आशुतोषच्या मृत्यूने कुटुंबियावर सणाच्या दिवशीच दु: खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्याच वर्षी तरुणाचं लग्न झालं होतं. अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबियांसोबत परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे.

तर वाचा नेमकं काय घडलं होतं.. ही घटना बदलापूर येथे घडली आहे. आशुतोष संसारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल धूलिवंदनाच्या निमित्ताने सोसायटीमध्ये स्पीकरवर गाणी लावून सोसायटीतील सगळे रहिवाशी नाचत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष पत्नीसह बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरात अनेक वर्षांपासून राहत होता.

तसेच आशुतोष देखील नाचण्याचा मोह आवरला नाही. त्याने देखील या सणाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे दुपारच्या सुमारास आशुतोष नाचून घरी गेला आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. जणू रंगाचा बेरंग झाल्याप्रमाणे सर्वांना जबर धक्का बसला.

दरम्यान, तिकडे मुंबईमध्ये देखील अशीच एक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.  पाण्याच्या फुग्यामुळे विरार पश्चिम भागात एका सायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे विरारमध्ये होळीच्या सणाला देखील गालबोल लागलं आहे. मृत पावलेल्या सायकलस्वाराचं नाव रामचंद्र पटेल असं आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने होळीचा सण साजरा करताना पाण्याचे फुगे मारण्यास बंदी केली आहे. परंतू अजुनही काही मंडळी धुळवडीदरम्यान सर्रास फुगे मारताना दिसतात. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. हा सण आनंदाचा, आयुष्यात रंग भरण्याचा असला तरीही अशा घटनांमुळे एखाद्याच्या घरी दुःखाचं वातावरण तयार होतं.

महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादी आणि एमआयएम युती करण्याच्या तयारीत? इम्तियाझ जलील आणि राजेश टोपे यांच्यात खलबतं
मागील ३० वर्षात काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन का झाले नाही? काय होती मुख्य कारणे?
माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा बदल, ‘या’ दिग्गज अभिनेत्याने अचानक सोडली मालिका
‘…म्हणून सुरेश रैना IPL लिलावात अनसोल्ड राहिला’, कुमार संगकारानं सांगितली इनसाईड स्टोरी

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now