जर तुम्ही मगरीच्या पाठीवर बसला आणि अचानक मगर उठली तर काय होईल याचा कधी विचार केला आहे का? नसेल केला तर या भानगडीतही पडू नका. कारण की, असे वेडे प्रकार नेहमी जीवावर बेतनारे असतात. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत एक व्यक्ती धाडस दाखवण्यासाठी चक्क मगरीच्या पाठीवर बसला आहे. इतकेच नव्हे तर, तो पाठीवर बसून डान्सही करत आहे. त्याचे हे वेडे चाळे बघून इतर लोक त्या व्यक्तीचा व्हिडीओ आणि फोटो काढताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रकारावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
https://www.instagram.com/tv/Cb4ehenjzvH/?utm_medium=copy_link
व्हिडीओत हा व्यक्ती मगरच्या तोंडासमोर जाऊन वेगवेगळ्या पोज देत आहे. त्याचे हे धाडस पाहून सर्वांनाच नवल वाटले आहे. परंतु असे काही प्रकार करणे जोखमीचे असते. अनेकवेळा यामध्ये व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. सध्या या व्हिडीओला अनेकांनी शेअर केले आहे.
तसेच धाडस दाखवणाऱ्या व्यक्तीचे काहींनी कौतुक केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंच्या प्रमाणात व्ह्यूज झाले आहेत. अनेकांनी व्हिडीओ पाहून व्यक्तीला थेट शिव्याही दिल्या आहेत. दरम्यान अशा प्राण्याजवळ जाणे किंवा त्यांना त्रास देणे जीव धोक्यात घालण्याचे काम असते.
यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात मगरीने थेट व्यक्तींवर हल्ला केला आहे. तसेच अशा प्रकारांमुळे काहींनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील व्यक्तीचे थोडक्यात प्राण वाचल्याचे म्हटले जात आहे.
जर तो व्यक्ती अजून थोडा काळ त्या ठिकाणी असता तर त्याला आपल्या वेडेपणाचे चांगलेच परिणाम भोगावे लागले असते. यावेळी कोणताच व्हिडीओ किंवा फोटो काढणारा व्यक्ती त्याच्या मदतीला आला नसता.
महत्वाच्या बातम्या
मी ज्यांना ओळखत होते त्या सगळ्यांसोबत माझ्या पतीचे शारिरीक संबंध होते, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक
एसटी कामगारांना हायकोर्टाचा झटका! विलीनीकरणाची मागणी फेटाळत दिला ‘हा’ शेवटचा अल्टिमेटम
‘या’ अभिनेत्यामुळे ऐश्वर्या-आभिषेकमध्ये पडली प्रेमाची ठिणगी, स्वत: आभिषेकने सांगितला मजेदार किस्सा