Share

VIDEO: कोरोनाकाळात कुठंच काम भेटेना, रानू मंडलने केला असा डान्स, चाहत्यांनीही केले कौतुक

आपल्या आवाजामुळे रातोरात लाइमलाइटमध्ये येणारी रानू मंडल तुम्हाला आठवत असेलच. राणू मंडल बराच काळ चर्चेत होती. आता पुन्हा एकदा रानू चर्चेत आली आहे. पण यावेळी ती तिच्या आवाजामुळे नाही तर तिच्या डान्समुळे चर्चेत आली आहे. रानूची अनोखी नृत्यशैली पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

https://www.instagram.com/reel/Cb91awolSdw/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओमध्ये रानू ट्विंकल खन्नाच्या ‘मेला’ चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर रानू मंडलने पुन्हा एकदा तिच्या डान्स स्टेप्सने दबदबा निर्माण केला आहे. रानू मंडलचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये रानूने निळ्या रंगाची मॅक्सी परिधान केलेली दिसत आहे. तसेच तिने कमरेला दुपट्टा बांधला असून ती नाचत आहे.

व्हिडिओमध्ये फक्त रानूच नाही तर तिच्या कुटुंबातील एक सदस्यही डान्स करताना दिसत आहे. रानूची ही वेगळी स्टाइल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रानूच्या या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. रानूच्या या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने म्हटले की, व्वा! आता गायल्यानंतर नाच. त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करत पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे, असे विचारले.

लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन रानू मंडल रातोरात स्टार बनली. प्रसिद्ध झाल्यानंतर रानूचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तेरी मेरी कहानीने रानूच्या नशिबाला मजल दरमजल केले. एकेकाळी सर्वत्र फक्त रानू मंडलचीच चर्चा होती. नोव्हेंबर २०१९मध्ये रानू मंडलने हिमेश रेशमियासोबत तीन गाणी रेकॉर्ड केली. त्यावेळीही रानू खूप लाइमलाइटमध्ये होती.

पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाच्या काळात रानूची प्रकृती पुन्हा बिघडली. रानूला काही काम मिळत नव्हते, त्यामुळे ती खूप नाराज होती. तथापि, आता रानूने सोशल मीडियावर असा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो काही वेळात व्हायरल होतो आणि लोकांना पश्चिम बंगालमधील राणाघाट स्टेशनवर तेरी मेरी कहानी गाणारी जुनी रानू आठवते.

महत्वाच्या बातम्या-
 हाल कैसा है जनाब का? रानू मंडलचा आणि सलमान खानचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल, तुम्ही पाहिला का?
रानू मंडल पुन्हा आली चर्चेत, आता पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर केला भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
रानू मंडल पुन्हा आली भेटीला, गायलं कच्चा बादाम गाणं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ
डुप्लिकेट सलमान खानला दबंगगिरी पडली महागात, पोलिसांनी या कारणामुळे केली अटक

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now