Share

पाकिस्तानी दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला जेवणात दाल-रोटी दिल्याने चाहते संतापले, म्हणाले..

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या भूमीत तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. एकीकडे 24 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाच्या पाहुणचारावरून पाकिस्तानला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.(dal-roti-at-the-dinner-for-the-australian-team-on-the-tour-of-pakistan)

खरं तर, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेनने (Marnus Labuschagne) त्याच्या ट्विटर हँडलवरून पाकिस्तानमधील लंचचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मार्नसने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दुपारच्या जेवणातही दाल आणि रोटी.’ त्याने कॅप्शनमध्ये जेवण ‘स्वादिष्ट’ असे लिहिले असले तरी, पाकिस्तानने पाहुणचारात संघाला जेवणासाठी दाल रोटी दिल्याबद्दल चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे.

मार्नस लॅबुशेनने हा फोटो शेअर करताच यूजर्सनी ते रिट्विट करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर पाकिस्तानवर टीका सुरू झाली. काहींनी पाकिस्तानवर राग काढला तर काहींनी ऑस्ट्रेलियाच्या साधेपणाचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले की, ही डाळ नाही तर डाळीच पाणी आहे. यातून डाळ शोधणे फार कठीण काम आहे. एक वापरकर्ता म्हणतो, ‘या देशात अन्न मिळत आहे हेच पुरेसे आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. पहिली कसोटी रावळपिंडी येथे खेळली गेली, जेथे खेळपट्टीचे वर्णन आयसीसीने सरासरीपेक्षा वाईट असल्याचे सांगितले आणि मोठी कारवाई केली. पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या संघाने पहिला डाव 476 धावांवर घोषित केला.

https://twitter.com/its_Engineer__/status/1502493583538290692?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502493583538290692%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fnews%2Fworld%2Fare-you-in-jail-pakistan-is-feeding-lentils-and-bread-to-the-australian-team-in-lunch-social-media-user-made-fun-of-it-2079886

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 459 धावांत सर्वबाद झाला. तर दुसऱ्या डावात पाकिस्तानने विकेट न गमावता 252 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानची एकही विकेट काढता आली नाही. त्यानंतर खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि चौकशीत आयसीसीने खेळपट्टीला सरासरीपेक्षा वाईट म्हटले.

महत्वाच्या बातम्या-
द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है
सहा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका; पीएफ वरील व्याजात प्रचंड घट
मन रमत नव्हते म्हणून त्याने वयाच्या २२ व्या वर्षी घर सोडले आणि.., भावाच्या विजयावर बोलली योगींची बहिण
सेटवर १५ वर्षीय रेखासोबत घडला होता हा भयानक प्रकार, ढसाढसा रडली होती रेखा, कर्मचारी वाजवत होते शिट्ट्या  

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now