एका महिलेच्या पोटातून सुमारे तीन किलोग्रॅम वजन असणारा, फुटबॉल सारख्या आकाराचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. महिलेच्या पोटातील एवढा मोठा ट्युमर पाहून अनेक डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला होता. मात्र, अखेर तिचे एका रुग्णालयात उपचार झाले आणि तिला होणाऱ्या वेदनांपासून तिची सुटका झाली.
छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात या महिलेवर उपचार करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी एवढी गंभीर केस बरी करण्याची जबाबदारी स्वीकारली. डॉक्टरांनी समर्पण भावनेतून उपचार केल्याने ही महिला आता आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे.
तिच्या पोटातून सुमारे तीन किलो वजनाचा ट्युमर यशस्वीपणे बाहेर काढण्यात आल्याने संबंधित डॉक्टरांचे कौतुक केलं जात आहे. ट्युमर ग्रस्त असणाऱ्या महिलेचे नाव ममता निषाद आहे. त्या छत्तीसगड येथील दुर्ग येथे राहतात. गेल्या दोन वर्षांपासून त्या उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात भटकंती करत होत्या.
त्यांना होणाऱ्या वेदना या असाह्य होत्या. मात्र, त्यांच्या ट्युमरचा आकार पाहून डॉक्टर त्यांच्यावर इलाज करण्यासाठी धजावत होते. अनेक डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नकार दिला. मात्र, शेवटी दुर्ग जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
या रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले. महिलेच्या कुटूंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले. महिलेच्या पोटातील एवढ्या मोठ्या ट्युमरला काढण्यात यश आल्यानंतर रुग्णालयाचे आणि संबंधित डॉक्टरांचे नाव व्हायरल झाले आहे.
ट्युमर ग्रस्त महिला यांनी उपचारानंतर सांगितले की, ‘माझ्या पोटात असह्य वेदना होत होत्या. प्रमाणापेक्षा अधिक रक्तस्त्राव होत होता, त्यामुळे शरीरात केवळ दोन ते तीन अडीच ग्रॅम हिमोग्लोबीन शिल्लक होते. या स्थितीत मी या शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.’