आपल्या मनोरंजन क्षेत्रात अनेक चांगले बदल झाले आहेत. या क्षेत्राने नेहमी चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अनेक नवनवीन कथा आपल्याला मागील अनेक वर्षांपासून पाहायला मिळाल्या. या कथा पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी कलाकार देखील खूप मेहनत घेत असतात. त्यांच्या याच मेहनतीचे फळ म्हणून त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.
चित्रपट क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांचे’ आयोजन केले जाते. ज्यामध्ये कलाकारांच्या कामाची प्रशंसा आणि सन्मान केला जातो. रविवारी (२० फेब्रुवारी) मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख, लारा दत्ता, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, अहान शेट्टी, सान्या मल्होत्रा यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. अनेक कलाकारांना त्यांच्या कामाबद्दल पुरस्कार देखील देण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल आशा पारेक यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर दुसरीकडे, रणवीर सिंगला ‘८३’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर क्रिती सॅननला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तसेच बाकी कलाकारांनी कोणता पुरस्कार जिंकला आणि कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला ते खालीलप्रमाणे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंग
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सॅनन
सर्वोत्कृष्ट पदार्पण – अहान शेट्टी
वर्षातील सर्वोत्तम चित्रपट – पुष्पा द राइज
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज – कँडी
वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज बाजपेयी
वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रवीना टंडन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष – विशाल मिश्रा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर
सर्वोत्कृष्ट लघुपट – पाउली
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म – अनोदर राउंड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – केन घोष
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – जयकृष्ण गुम्मडी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सतीश कौशिक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दत्ता
सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता – आयुष शर्मा
पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिमन्यू दासानी
पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राधिका मदन
वर्षातील दूरदर्शन मालिका – अनुपमा
सर्वोत्कृष्ट अभिनेता टीव्ही – शाहीर शेख
सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री – श्रद्धा आर्या
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता टीव्ही सीरियल – धीरज धूपर
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेत्री टीव्ही सीरियल – रुपाली गांगुली
समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट – सरदार उधम
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कियारा अडवाणी
त्याचबरोबर या सोहळ्यात लकी अलीने ओ सनम या गाण्यावरही परफॉर्म केला. नेहमीप्रमाणेच प्रत्येकजण त्याच्या परफॉर्म दंग झाले होते. त्याचबरोबर या सोहळ्याचे अनेक फोटो देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.