मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या मागील दोन सभांमध्ये मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ईदचा म्हणजेच ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिलं आहे.
असं न झाल्यास मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. दादरमध्ये राज ठाकरेंनी मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेला जुना फोटो असणारे बॅनर्स झळकले आहेत.
त्यामुळे पुन्हा मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. अशातच राज ठाकरेंचा एक जुना फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या फोटोमध्ये राज यांनी डोक्यावर मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेली पाहायला मिळत आहे. खांद्यावर कापड घेतलं असून त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
दादरमध्ये राज ठाकरेंनी मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेला जुना फोटो असणारे बॅनर्स झळकले आहेत. वाचा नेमकं काय लिहिले आहे त्या बॅनर्समध्ये.. मध्यभागी भगव्या रंगाच्या आयतामध्ये ‘हनुमान’ असं लिहिलं आहे. तर बाजूला चार प्रश्नचिन्हं छापण्यात आली असून त्यावर ‘उद्या’ असं लिहिले आहे.
राज यांचा काल पर्यंत मुस्लिमांना पाठिंबा होता. आज ते हनुमानाचं नाव घेत आहेत तर उद्या काय करतील याबद्दल प्रश्नच आहे, अशा अर्थाने हा बॅनर लावण्यात आला आहे. सध्या हा बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र हे बॅनर नेमके कोणी लावले हे स्पष्ट झालेले नाहीये.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं होतं. शिवसेनेला हिंदुत्वासाठी जागं करण्याचा प्रयत्न असल्याचं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर लाउडस्पीकर जप्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
काय सांगता? सलमानची नाही तरत विराट कोहलीची वहिणी होणार सोनाक्षी सिन्हा, लवकरच होणार लग्न
आपलं नातं सगळ्याच्या पल्याड आहे, तू माझी.., कुशल बद्रिकेने मेव्हणीसाठी केली खास पोस्ट
Xiaomi च्या दमदार 4K smart TV वर मिळतोय ‘एवढ्या’ हजारांचा डिस्काऊंट, आताच खरेदी करा नाहीतर..
ज्या दिवशी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी.., नवनीत राणांनी केले मोहन भागवतांचे समर्थन