uddhav thackeray : शिवसेनेत दोन गट पडल्यापासून राजकीय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्र पिंजून काढला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून रणनीति आखली जातं आहे. अशातच बंदरे, मत्स्यविकास मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक आव्हान दिले आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असल्याचं बोललं जातं आहे.
‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढतो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जा,’ असं खुलं आव्हान भुसे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. गुरुवारी शिंदे गटाची रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी झाली.
यावेळी भुसे यांनी उद्धव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याचाच धागा पकडत भुसे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना भुसे यांनी दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री शिंदे हे अडीच महिन्यांपासून काम करीत आहेत. तसे काम अद्याप एकाही मुख्यमंत्र्यांनी आधी केलेले नाही, असं म्हणतं भुसे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. तर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना भेटले नाहीत आणि आता प्रत्येकाला भेटत आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं.
पुढे बोलताना भुसे यांनी एक आठवण देखील सांगितली आहे. ‘अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी घरात बसून काहीही काम केले नाही. निर्णय घेण्याबाबत आम्ही उद्धव यांना सांगत होतो. मात्र अजित पवार हे खोडा घालण्याचे काम करीत असल्याने आमची अडचण झाली, असं भुसे यांनी स्पष्टच सांगितलं.
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!