dada bhuse and suhas kande upset on government | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात दोन गट पडले आहे. एक एकनाथ शिंदे गट आहे, तर दुसरा उद्धव ठाकरे गट आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहे. तर अपक्ष १० आमदार आहे. पण त्यांच्यापैकी काही आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावरही आता आमदार नाराज असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शिंदे गटात फुट पडल्याची जोरदार चर्चा आहे. पक्षावर असलेल्या नाराजीमुळे बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना सुद्धा आता आमदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले असता दोन आमदारांमध्ये असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून आली. शिंदे समर्थक असलेल्या दोन आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे हे दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे.
सुहास कांदे आणि दादा भुसे यांचे दोन्ही गट एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते. काही दिवसांपूर्वीच सुहास कांदे यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन सुहास कांदे नाराज असल्याची चर्चा होती.
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे सुहास कांदे यांनी म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात ती नाराजी स्पष्टपणे दिसून आली. अशात शिंदे गटात खरंच फुट पडली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याआधीही एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी असल्याचे दिसून आले होते. मंत्रिपदामुळे काही आमदार नाराज असल्याची चर्चा होती. आमदार बच्चू कडू, आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते शिंदेवर खुप नाराज झाले होते. तसेच त्यांनी आपली नाराजी जाहीर बोलूनही दाखवली होती.
महत्वाच्या बातम्या-
dada bhuse : शिंदे गटातही पडली फूट! थेट मुख्यमंत्र्यांच्या समोरच उफाळून आली ‘या’ आमदारांची नाराजी
१८ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी; महाराष्ट्रातील ‘या’ ग्रामसभेत ठराव मंजूर
Aftab : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये असताना, ‘या’ डेटिंग ऍपच्या माध्यमातून अफताब शोधत होता नवी शिकार