सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहचले आहेत. त्यात बाजारात आलेल्या नवनवीन कार आणि त्यांच्या किंमती ऐकून सामान्य माणसाचे तर डोळेच फिरतात. अशी परिस्थिती असताना एका सामान्य कुटूंबातील युवकाने चक्क ३०हजार रुपयांमध्ये फोर्ड कंपनीची गाडी बनवली आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याआधी सांगलीत दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी ची प्रचंड चर्चा झाली होती. अशातच आता सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकनी ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी बनवलेली आहे. अशोक आवटी यांनी देखील दत्ता लोहार यांच्याप्रमाणे भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून ,जुगाड करत ही गाडी बनवली आहे.
ही गाडी हुबेहूब १९३० सालच्या फोर्ड गाडीसारखी दिसत आहे. भंगारातील एमएटी गाडीचं इंजिन आणि रिक्षाचे हब आणि आणखी काही पार्टचा जुगाड करून, लोखंडी पत्रा आणि अँगल पासून ही १९३० ची अलिशान FORD साकार झाली आहे. यास फक्त तीस हजार खर्च आला आहे.
गाडीला LED लाइट आहेत. इंडिकेटर, हॉर्न अशी ही सेम टू सेम फोर्ड गाडी आहे असे वजन जवळपास १०० किलो इतके आहे आणि ३ ते ४ जण सहजरित्या या गाडीने जाऊ शकतात. गाडी ३० किमी इतके मायलेज देते. रिक्षा प्रमाणे हँड किक वर गाडी सुरू होते आणि पेट्रोल वर चालते.
माहितीनुसार,अगदी कमी वयापासून अशोक यांना गाड्या दुरुस्तीचा छंद जडला. गॅरेज थाटले आणि गाड्या दुरूस्त करता-करता अनेक वस्तू, मशीन खोलाखोलीचा नाद त्यांना लागला. वेगवेगळ्या गाड्या माॅडिफाय केल्या. याचं पार्ट त्याला त्याचं याला, अशी उसाबर केली. चांगलं आणि वेगळं बनवायचा प्रयत्न केला. आता चारचाकी गाडी बनवायचं मनावर घेतलं आणि दोन वर्षे पूर्ण वेळ देऊन शेवटी ही गाडी तयार केली आहे.
अशोक यांनी २०१९ ला सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात युट्यूब वरचे व्हिडिओ पाहून ही गाडी बनवली. मुलांना खेळण्यासाठी आणि घरात एक गाडी असावी असे त्यांचे स्वप्न होते. आज अडीच वर्षानंतर अशोक आवटीचे स्वप्न प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलय ते या फोर्ड गाडीच्या रुपात. सध्या त्यांच्या या गाडीची चर्चा सर्वत्र होत आहे. अशोक यांच्या मेहनतीला अनेकांनी सलाम केला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे का काचा बदलण्याचा?’ विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा
‘असं करून विराट कधीच युवा खेळाडूंचा आदर्श बनू शकत नाही’, गौतम गंभीरच्या कानपिचक्या
चर्चा तर होणारच! ‘मिस बिकीनी गर्ल’ला कॉंग्रेसने दिले उमेदवारीचे तिकीट, वाचा तिच्याबद्दल..