उन्हाळा येण्याची प्रत्येकजण एका खास गोष्टीसाठी वाट पाहत असतात, ती म्हणजे आंबे. मधुर, रसाळ आंबे खायला मिळावेत यासाठी लोक वर्षभर वाट पाहत असतात. उत्तम आंबे चाखण्यासाठी आंबेप्रेमी पैसे देखील खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. आता एका अशाच आंब्याची किंमत तुम्ही ऐकाल तर तुमचे डोळे फिरतील.
देशात विविध प्रकारच्या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्या किंमती देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आता आम्ही तुम्हाला अशा एका आंब्याची माहिती देणार आहोत ज्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. या आंब्याचे नाव ‘तायो नो तुमांगो’ असे आहे. या आंब्याची जपानमध्ये लागवड केली जाते.
आता या आंब्याची मध्य प्रदेशातील जबलपूर येथे देखील लागवड केली जात आहे. याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये प्रतिकिलो आहे. या किंमतीमध्ये चक्क एक नवीकोरी बुलेट येईल. जबलपूरचे रहिवासी संकल्प परिहार या लाखमोलाच्या आंब्यांचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी या आंब्याच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली आहे.
त्यांनी आंब्यांच्या संरक्षणासाठी बागेत 3 रक्षक आणि 9 कुत्रे ठेवले आहेत. त्यामुळे त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. बागेला एवढी सुरक्षा देण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी या बागेत चोरी झाली होती. या आंब्याला ‘एग ऑफ सन’ म्हणजेच सूर्याचं अंड असं देखील नाव आहे.
हा आंबा पूर्णपणे पिकल्यावर त्याचा रंग फिकट पिवळा आणि लाल होतो. आंब्याचं वजन 900 ग्रँमच्या आसपास जातं. चवीला हा आंबा अतिशय गोड असतो. जपानमध्ये या आंब्याचं उत्पादन पॉलिहाऊस मध्ये घेतलं जातं. मात्र, जबलपूर मधील परिहार संकल्प या आंब्याचे उजाड जमिनीवरच उत्पादन घेत आहेत.
परिहार संकल्प यांनी चार एकरवर या आंब्याची लागवड केली आहे. याची 52 झाडं त्यांनी लावली आहेत. दरवर्षी ते 14 विविध प्रकारच्या आंब्याचं आंब्याचं उत्पादन घेत असतात. त्यांनी त्यांच्या बागेच्या सुरक्षिततेसाठी आता जी काळजी घेतली आहे आणि जो खर्च केला आहे, याची सर्वत्र चर्चा होत आहे.