सोशल मीडियावर सध्या हैद्राबाद कस्टडी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आणि दबंग पीएसआय पल्लवी जाधव यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्या नुकत्याच लग्नबंधनात अडकल्या आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या फोटोला प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
पल्लवी आणि कुलदीप यांचा 15 मे रोजी औरंगाबादमधील सुर्या लॉन्समध्ये विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो पल्लवी यांनी सोशल मीडियावर टाकले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे लग्नातील रूप पाहून अनेकजण अवाक झाले आहेत.
पल्लवी यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाल्यास, पल्लवी या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या आहेत. अभिनेत्री बनण्याचं त्यांचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीची जाण असलेल्या पल्लवी यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
https://www.instagram.com/p/Cdr7IH3rxwi/?igshid=YmMyMTA2M2Y=
आर्थिक परिस्थिची जाणीव असणाऱ्या पल्लवी यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आई वडिलांनी बचत गटातून 5 हजारांचे कर्ज काढून दिले. कमवा आणि शिका या योजनेतून पल्लवी यांनी एम ए मानसशास्त्रमध्ये पदवी प्राप्त केली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नामध्ये पीएसआय परीक्षेत देखील यश मिळविले.
पल्लवी जाधव जालनामधील महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाच्या दबंग अधिकारी म्हणून देखील ओळखल्या जातात. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनर अप हा किताब जिंकला आहे.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मी आयुष्यभर पोलीसच राहीन आणि पोलीस म्हणून निवृत्त होईल.असे सांगितले होते. वर्दी हेच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम, असं त्या ठामपणे सांगतात. असं असलं तरी मॉडेलिंग हा त्यांचा फक्त छंद आहे.
लवकरच पल्लवी ‘हैद्राबाद कस्टडी’या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात पल्लवी मुख्य भूमिकेत असून अभिनेता मंगेश देसाई आणि अभिनेत्री तेजा देवकर देखील झळकणार आहेत. त्यामुळे आता दबंग पीएसआय पल्लवी जाधव यांना चित्रपटात काम करताना पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.